Katrina Kaif-Vicky Kaushal Net worth : विकी कौशल की कटरिना कैफ, दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण ? दोघांचं नेटवर्थ किती ?

Katrina Kaif-Vicky Kaushal Networth : बॉलिवूडमधील पॉवर कपल विकी कौशल आणि कटरिना कैफ यांनी स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. दोघेही कोट्यवधींचे मालक आहेत. त्यांची संपत्ती किती, दोघांपैकी सर्वांत श्रीमंत कोण, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते.

Katrina Kaif-Vicky Kaushal Net worth : विकी कौशल की कटरिना कैफ, दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण ? दोघांचं नेटवर्थ किती ?
कतरिना कैफ- विकी कौशल
| Updated on: May 16, 2026 | 2:50 PM

बॉलिवूडमधील हँडसम हंक आणि तितकाच उत्तम अभिनेता असलेला विकी कौशल याचा आज (16 मे) वाढदिवस. आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून, तो आता कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. त्याची पत्नी, कतरिना कैफ, ही सुद्धा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. या पॉवर कपलमध्ये कोणाची संपत्ती सर्वाधिक आहे, चला जाणून घेऊया.

संपत्ती किती ?

कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या जोडप्याची एकूण संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज आहे. GQ च्या एका रिपोर्टनुसार, कतरिनाची एकूण संपत्ती अंदाजे 224 कोटी रुपये आहे, तर विकी कौशलकडे अंदाजे 41 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची एकत्रित एकूण संपत्ती अंदाजे 265 कोटी रुपये आहे.

रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये फी म्हणून घेतो. गेल्या वर्षी आलेल्या’छावा’ या चित्रपटासाठी विकीने 10 कोटी रुपये घेतले होते. यावर्षी कतरिना कैफचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी, तिने ‘मेरी ख्रिसमस’साठी अंदाजे 15 कोटी रुपये घेतले होते. चित्रपटांव्यतिरिक्त, हे दोन्ही कलाकार ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरीव उत्पन्न मिळवतात.

ब्रँडची मोठी कमाई

चित्रपटांव्यतिरिक्त, कतरिना कैफचा ‘के ब्यूटी’ हा ब्युटी ब्रँडदेखील वेगाने यश मिळवतोय. लाँच झाल्यावर अवघ्या तीन वर्षांतच, या ब्रँडने 100 कोटी वार्षिक उलाढाल गाठली. जुलै 2025 पर्यंत, कंपनीचा महसूल अंदाजे 240 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले. त्यांनी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. गेल्या वर्षी या जोडप्याला विहान नावाचा मुलगा झाला. लग्नानंतर, कतरिना कैफ आणि विकी कौशल मुंबईच्या जुहू भागातील सी-फेसिंग आलिशान ४ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. या आलिशान घराचे भाडे दरमहा सुमारे 8 ते 9 लाख रुपये असल्याचं बोललं जातं .

अनेक प्रॉपर्टींची मालकी

कतरिना कैफच्या मालकीच्या अनेक आलिशान मालमत्ता आहेत. मुंबईतील वांद्रे येथे तिच्या मालकीचा एक स्टायलिश 3 बीएचके अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत अंदाजे 8.2 कोटी रुपये आणि लोखंडवाला येथील मालमत्तेची किंमत अंदाजे 17 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. तसेच लंडनमध्ये तिच्या मालकीचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत अंदाजे 7 कोटी रुपये आहे. लग्नापूर्वी, विकी कौशल आपल्या कुटुंबासह अंधेरी पश्चिम येथे राहत होता.

आलिशान कार्सही ताफ्यात

आलिशान गाड्यांच्या बाबतीत कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या तोडीचं दुसरं कोणी नाही. त्यांच्याकडे शानदार रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ जीएलई, ऑडी क्यू7 आणि बीएमडब्ल्यू 5 सिरीज ग्रॅन टुरिस्मो या कार आहेत. सगळ्या कारची किंमत कोट्यवधींमध्ये आहे..

Follow Us