
सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे कोणते व्हिडीओ कधी व्हायरल होतील काही सांगता येत नाही. बऱ्याचदा सेलिब्रिटींचे जुने व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याचा असून या व्हिडीओत हे दोघेही ओळखायलाच येत नाहीयेत.
ही जोडी मुंबईच्या रस्त्यावर हेलमेट घालून स्कुटीवरुन फेरफटका मारताना दिसून येत आहे. या व्हिडीओमधील हे कपलं सर्वांच्याच ओळखीचे आणि सर्वात आवडते आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओमध्ये या दोघांनीही हेलमेट घातलेलं असल्यानं त्यांना ओळखता येत नाहीये.
मुंबईच्या रस्त्यावर स्कुटीवरुन फिरणारी ही जोडी कोण?
मुंबईच्या रस्त्यावर स्कुटीवरुन फिरणारी ही जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली. अनुष्का आणि विराटाचा हा जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय.
तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये विराट आणि अनुष्का हे अगदी सामान्य लोकांसारखं स्कूटीवरून मुंबईच्या रस्त्यावर फिरत होते. दोघांनीही हेल्मेट घातलेल होतं. त्यामुळे त्यांना सहज कुणी ओळखू शकलं नाही. त्यांचा हा जुना व्हिडीओ सध्या मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विराट आणि अनुष्काची हेलमेट घालून स्कुटरवारी
विराट आणि अनुष्का एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मड आयलंडवर गेले होते. तिथून परतताना दोघे काळ्या रंगाच्या स्कूटीवर फिरताना दिसले. यावेळी दोघेही काळे हेल्मेट घातले होते. कोणीही त्यांना ओळखू नये यासाठी त्यांनी ही काळजी घेतली होती. मात्र या स्टार जोडप्याला एका कॅमेरामनने ओळखले आणि चाहत्यांनीही त्यांचा पाठलाग केला. अखेर कॅमेऱ्यात कैद झाल्यावर अनुष्का आणि विराटने मीडियासमोर फोटो पोजही दिल्या.
स्कूटीवर पाहून चाहतेही खुश झाले
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच सर्वांसाठी कपल गोल्स आहेत. ही जोडी त्यांचे रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. ते दोघे कधी डान्सचे व्हिडिओंनी चाहत्यांचं मनोरंजन करतात. तर कधी एकत्र जिम करतानाचे व्हिडीओ बनवतात. विराट आणि अनुष्का यांनी बऱ्याच जाहिरातींमध्येही एकत्र काम केलेलं आहे. आई-वडील झाल्यापासून आता ते क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसतात. मात्र, त्यांना स्कूटीवर पाहून चाहतेही खुश झाले आहेत.
अनुष्काचा नवा चित्रपट कधी येणार?
तसेच अनेकदा ही जोडी आपल्या मुलांसोबत खास क्षण घालवताना दिसतात. पण जेव्हा त्यांचा फॅमिली टाईम सुरु असतो तेव्हा मात्र हे दोघांनाही त्यांची पर्सनल स्पेस जपताना पाहायला मिळतात. सध्या अनुष्का शर्मा बॉलिवूडपासून सध्या दूर असून तिनं त्यांची मुले आकाय आणि वामिकासोबतच वेळ घालवताना दिसते.
अनुष्का शर्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवरील बायोपिक ‘चकदा एक्सप्रेस’मुळे अनुष्का गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचं शुटिंग झालं आहे. पण, तो कधी प्रदर्शित होणार, याबद्दल काहीच अपडेट नाही.