AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय देवरकोंडाच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने, नेमकं काय म्हणाला?

विजय देवरकोंडाच्या चाहत्यांना त्याच्या आगामी ‘किंगडम’ या चित्रपटाची उत्सुकता आहे. नुकतंच विजय या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये सहभागी झाला, जिथे त्याने चाहत्यांची मने जिंकली.

विजय देवरकोंडाच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने, नेमकं काय म्हणाला?
Vijay DevarkondaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 29, 2025 | 5:18 PM
Share

पॅन-इंडिया अभिनेता विजय देवरकोंडा सध्या आपल्या आगामी ‘किंगडम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २६ जुलै रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता विजयने असं काही सांगितलं आहे, ज्यामुळे त्याचं खूप कौतुक होत आहे.

सोमवारी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे विजय उपस्थित होता. तिथे त्याचे असंख्य चाहतेही हजर होते. यावेळी त्याने चाहत्यांची मने जिंकली. विजयने आपल्या चाहत्यांना सांगितलं, “तुम्ही सर्व माझ्यासाठी देवाने दिलेली देणगी आहात.”

वाचा: मुलापासून मुलगी बनलेल्या अनया बांगरचा जलवा, हे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल

चाहत्यांनी नेहमीच केला विजय देवरकोंडाचा पाठिंबा

विजयने असंही सांगितलं की, चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून त्याचे चाहते नेहमीच त्याच्यासोबत उभे राहिले आहेत आणि प्रत्येक चित्रपटाच्या वेळी त्याच्या यशाची आतुरतेने वाट पाहतात. जिथे बहुतेक चाहते ‘तुझा चित्रपट’ असे शब्द वापरतात, तिथे विजयचे चाहते त्याच्या चित्रपटाला ‘आमचा चित्रपट’ म्हणतात, आणि यामुळे विजयला आपलं असल्यासारखं वाटलं. या इव्हेंटमध्ये चाहत्यांसोबतच्या या नात्याबद्दल बोलताना विजय थोडा भावनिकही झाला.

या इव्हेंटमध्ये विजयने ‘किंगडम’चे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी, संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर आणि इतर सहकलाकारांचंही कौतुक केलं. हा चित्रपट येत्या काही दिवसांत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि तमिळमध्ये ‘किंगडम’ या नावाने प्रदर्शित होईल, तर हिंदीत याला ‘साम्राज्य’ या नावाने प्रदर्शित केलं जाईल.

‘किंगडम’ कधी प्रदर्शित होतोय?

विजयचे सर्व चाहते या चित्रपटासाठी खूप उत्साहित आहेत आणि त्याला पडद्यावर पाहण्यासाठी आतुरले आहेत. हा उत्साह ३१ जुलै रोजी पूर्ण होणार आहे. या चित्रपटात विजय एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री बोरसे दिसणार आहे. विजयच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण तो बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसणार आहे. तो शेवटचा ‘कल्कि २८९८ एडी’ या चित्रपटात कॅमियो अवतारात दिसला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.