
दक्षिण भारतीय अभिनेता विजय थलपती हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. ‘थलपती 69’ या आगामी चित्रपटासाठी त्याने 275 कोटी रुपये घेतले आहे. साऊथ सुपरस्टार विजय थलपती याने लागोपाठ अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हीट झाले आहेत. या चित्रपटाला त्याच्या राजकारणातील एण्ट्री आधीचा शेवटचा चित्रपट म्हणून म्हणून पाहीले जात आहे.
‘थलपती 69’ या चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते अनेक दिवसांपासून पाहात होते. कन्नड आणि तेलगु इंडस्ट्रीजमध्ये अनेक ब्लॉकब्लास्टर चित्रपट देणाऱ्या प्रोडक्शन हाऊस चित्रपट तयार करीत आहे. याआधी शाहरुख खान याला अलिकडील त्याच्या चित्रपटातून सर्वाधिक 250 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्यामुळे आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्यात शाहरुखचा नंबर विजय थलपती याने हिसकावला आहे.
‘थलपती 69’ या चित्रपटाची घोषणा 13 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता विजय थलपती हा दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या सोबत काम करणार आहे. ‘थलपथी 69’ हा एक संपूर्णपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असून आणि विजय थलपती राजकारणात प्रवेश करणार असला तरीही हा चित्रपट राजकीय विषयांना स्पर्श करणार नाही असे विनोथ यांनी चाहत्यांना वचन देताना म्हटले आहे.