माधुरी दीक्षित नाही, विनोद खन्नांचा ‘या’ अभिनेत्रीसोबत बेडरुम सीन करताना सुटला ताबा, अभिनेत्री ओरडू लागली
एका चित्रपटात विनोद खन्ना अभिनेत्रीसोबत बेडरुम सीन करताना इतके वाहत गेले की त्यांचा ताबा सुटला. त्यांच्या अशा वागण्याने अभिनेत्री इतकी घाबरली की ती मोठ्याने ओरडू लागली.

बॉलिवूड सेलिब्रिटी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. कधी त्यांचे रिलेशनशिप तर कधी त्यांच्या पार्टी तर कधी त्यांचे अफेअर्स. बऱ्याचवेळा सेलिब्रिटींच्या काही गोष्टी चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचदा शुटींगदरम्यान अनेकदा असे किस्से घडतात जे अभिनेत्रींना फार काही सुरक्षित वाटत नाही. अनेकदा अभिनेत्यांचा इंटीमेट सीनवेळी स्वत:वरील ताबा सुटतो आणि भलतंच घडतं. असं बऱ्याचदा घडलं होतं ते अभिनेते विनोद खन्नासोबत.
दिग्दर्शकाने कट बोलल्यानंतरही त्यांच्या कानापर्यंत तो शब्द पोहोचलाच नाही
विनोद खन्ना हे त्यांच्या दमदार भूमिकेमुळे ओळखले जातात. प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेन त्यांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. पण एका चित्रपटातील त्यांच्या आणि माधुरी दीक्षितच्या इंटीमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. पण अजून एक अभिनेत्री आहे जिच्यासोबत यापेक्षा विचित्र प्रकार घडला होता. त्या अभिनेत्रीसोबत बेडरूम सीन करताना विनोद खन्ना इतके वाहत गेले की दिग्दर्शकाने कट बोलल्यानंतरही त्यांच्या कानापर्यंत कट हा शब्द पोहोचलाच नाही.त्यानंतर ती अभिनेत्री इतकी घाबरली की ती ओरडू लागली.
जेव्हा विनोद खन्ना हे केवळ सुपरस्टार होते.
विनोद खन्ना हे बॉलिवूडमधील डॅशिंग स्टार होते ज्यांनी 70-80 च्या दशकात एक खास ओळख निर्माण केली. बॉलिवूडच्या जगात एक काळ असा होता जेव्हा विनोद खन्ना हे केवळ सुपरस्टार होते. विनोद खन्ना यांनी हेमा मालिनी, रेखा, अमृता सिंग, माधुरी दीक्षित अशा अनेक अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांच्या बेडरुम सीनमध्ये ज्या अभिनेत्रीसोबत नियंत्रण सुटलं ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारची पत्नी तथा प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया होती. 1983 मध्ये राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर, डिंपल कपाडिया यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. महेश भट्ट यांनीही तिला त्यांच्या ‘प्रेम धर्म’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
विनोद खन्नांनी अभिनेत्रीला किस केलं अन्….
विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया दोघांसाठीही हा त्यांच्या कारकिर्दीचा पुन्हा एकदा शुभारंभ होता. विनोद खन्ना देखील सन्यास घेतल्याच्या 5 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतले होते. विनोद खन्ना बऱ्याच काळानंतर एका चित्रपटात एका रोमँटिक सीनचे चित्रीकरण करत होते. असं झालं की एका दृश्यात विनोद खन्ना यांना डिंपलला किस करून मिठी मारावी लागणार होती. मात्र, दिवसरात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने विनोद खूप थकले होते आणि ते चित्रपटाच्या सेटवर उशिरा पोहोचले. संपूर्ण दृश्य मंद प्रकाशात एका खोलीत चित्रित करण्यात आले होते. दिग्दर्शक महेश आणि क्रू मेंबर्सनी ‘अॅक्शन’ म्हटले आणि कॅमेरा चालू केला.
- Dimple Kapadia and Vinod Khanna
विनोद खन्ना अभिनेत्रीला मिठी मारत तिला किस करत राहिले
विनोद खन्ना यांनी डिंपलला किस केलं आणि नंतर तिला मिठी मारली. पण महेश यांना वाटले की सीन थोडा अजून लांब असावा म्हणून त्यांनी दुसरा शॉट घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी महेश यांनी अॅक्शन म्हटले आणि पुन्हा शूट सुरू केलं. अॅक्शन ऐकून विनोद खन्ना यांनी सूचनांनुसार डिंपलला किस करायला सुरुवात केली. त्यांनी तिला मिठी मारताच महेश यांनी पुन्हा कट म्हटलं. पण त्यांचा आवाज विनोद यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही. यानंतर विनोद खन्ना डिंपल कपाडियाला मिठी मारत तिला किस करत राहिले.
अखेर अभिनेत्रीची माफी मागितली
अभिनेत्याच्या या कृतीने डिंपलला धक्का बसला, कारण तिला काय होत आहे हे समजत नव्हते. ती इतकी घाबरली की ती मदतीसाठी ओरडायला लागली. पण विनोद खन्ना इतके वाहून गेले होते की बेडरूम सीन करताना त्यांचे नियंत्रण सुटले. डिंपलला धक्का बसला आणि ती अस्वस्थ झाली. ती तिच्या मेकअप रूममध्ये धावत गेली आणि रडू लागली. पण नंतर जेव्हा महेश भट्ट आणि विनोद खन्ना यांना हे कळले तेव्हा दोघांनीही तिची माफी मागितली.
