सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान तूफान चर्चेत असलेले नाव आहे. सलमान खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यातच आता सलमान खान आणि अर्पिता खान यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडलाय.

सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
Salman Khan
| Updated on: Aug 29, 2026 | 3:22 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्याच्या या व्हिडीओने चाहत्यांमध्ये चिंता पसरली. सलमान खान आजारी असल्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसली. त्यानंतर चाहत्यांनाच मोठा सवाल करताना सलमान खान दिसला. काल देशभरात जोरदार पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रेटीमध्येही मोठी धूम रक्षाबंधनची बघायला मिळाली. सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिता खान शर्माने भाऊ सलमानला राखी बांधली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. अर्पिताने सोशल मीडियावर रक्षाबंधनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अर्पिताने भाऊ सलमान खान याला ओवाळून राखी बांधली. दोघेही खूप जास्त आनंदी दिसले.

या व्हिडीओमध्ये सलमान खान याने रेड टी शर्ट ब्लॅक रंगाची हॅट घातल्याचे दिसतंय. सलमान खान आणि अर्पिता यांच्या या व्हिडीओमध्ये सर्वात जास्त लक्ष भिंतींवर लावलेल्या फोटोंवर लोकांचे जात आहे. भिंतीवर ईसा मसीहचा मोठा फोटो दिसत आहे. द लास्ट सपर दिसत आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.

एका युजर्सने लिहिले की, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सब है भाई भाई… दुसऱ्याने लिहिले की, भाई धर्मनिरपेक्ष है… लोक या व्हिडीओनंतर मोठे काैतुक करत आहेत. तिसऱ्या व्यक्तीने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, सलमान खान हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत. या व्हायरल व्हिडीओनंतर सलमान खान धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगताना सर्वजण दिसत आहेत.

सलमान खान आणि अर्पिता खान यांच्या या व्हिडीओने लोकांचे मन जिंकले आहे. काैतुकाचा वर्षाव केला जात आहे. सलमान खान सर्व धर्म मानतो, असेही व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले जात आहे. सलमान खान सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड करिअरमध्ये धमाकेदार चित्रपट केले आहेत.

Follow Us