भेंडीची भाजी खाण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टींचा नक्की करा विचार, तुमच्यासाठी ठरु शकते घातक!
भेंडीची भाजी लाहन मुलांपासून मोठ्यांना देखील प्रचंड आवडते. पण ही भाजी प्रत्येकासाठीच योग्य नाही. काही समस्या असणाऱ्यांसाठी भेंडीची भाजी धोक्याची ठरु शकते. तर जाणून घ्या कोणी भाजी खायला हवी आणि कोणी नाही.

भेंडीची भाजी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. अनेकांना भेंडी आवडते आणि ती चांगली गोष्ट देखील आहे. कारण ती आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. भेंडीच्या भाजीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे संतुलित आहारात तिचा समावेश केला जाऊ शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एखादा पदार्थ आरोग्यदायी आहे, याचा अर्थ असा नाही की त्याचा परिणाम प्रत्येकावर सारखाच होईल. त्यामुळे, ज्यांना काही आरोग्य समस्या आहेत, त्यांनी या भाजीपासून दूर राहणेच योग आहे…
सांगायचं झालं तर, भेंडीमध्ये ऑक्सलेट्स देखील असतात. त्यामुळे, जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल, पचनाच्या काही समस्या असतील किंवा तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर तुमच्या आहारात भेंडीच्या प्रमाणाबद्दल डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम राहील.
ज्यांना मुतखडा आहे किंवा ज्यांना पूर्वी मुतखडा झाला आहे, त्या सर्वांनी भेंडी खाणं पूर्णपणं बंद करणं योग्य नाही. ज्यांना कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या मुतखड्याचा इतिहास आहे, त्यांच्या आहारातील ऑक्झॅलेटचं प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांकडून वैयक्तिकरित्या ठरवलं जाऊ शकतें. तसेच, आहार, पाण्याचं सेवन आणि इतर आरोग्य स्थिती यांचाही विचार केला जातो.
ज्यांच्या रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे, ते त्यांच्या आहारातील प्युरिन्स आणि युरिक ॲसिडशी संबंधित खाद्यपदार्थांकडे अधिक लक्ष देतात. तथापि, भेंडीमधील ऑक्झॅलेट्समुळे युरिक ॲसिड वाढतो याचा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे, “भेंडी खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढतो” असं थेट म्हणणे योग्य नाही. युरिक ॲसिड असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी सांगितलेला आहार आणि औषधे सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे.
भेंडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनक्रियेस मदत करू शकते. पण काही लोकांसाठी, जास्त फायबरचं सेवन केल्याने गॅस, पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) असलेल्या लोकांसाठी, कोणत्या पदार्थांमुळे लक्षणे उद्भवतात याकडे लक्ष देणे विशेष महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रिया सारखी नसते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन के असते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावते. वॉरफेरिनसारखी काही रक्त गोठू न देणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी व्हिटॅमिन के असलेल्या पदार्थांचे सेवन अचानक वाढवल्यास किंवा कमी केल्यास, त्यांच्या औषधांच्या परिणामात बदल होऊ शकतो. त्यामुळे, अशी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी भेंडी खाणे पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांच्या आहारातील व्हिटॅमिन के चे प्रमाण सातत्यपूर्ण ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणं महत्त्वाचं आहे.
