लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन; अखेर गार्डने तिला घट्ट धरलं अन्….धक्कादायक व्हिडिओ

लंडनमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत गैरवर्तनाचा एक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती प्रचंड गर्दीत अडकलेली दिसत आहे.

लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन; अखेर गार्डने तिला घट्ट धरलं अन्....धक्कादायक व्हिडिओ
mahira khan
Image Credit source: instagram
| Updated on: May 27, 2025 | 3:42 PM

भारतात पाकिस्तानी स्टार्ससाठी नो एन्ट्री बोर्ड सध्या लावण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तेथील सर्व सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही बंदी घातली आहे. तथापि, तिथून अनेक स्टार इतर देशांमध्ये येत-जात राहतात. दरम्यान, प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा लंडनमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. लंडनमध्ये माहिरा खानशी गैरवर्तन झाल्याचा आणि त्यामुळे तिची झालेली अवस्था याचा हा व्हिडिओ असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन

सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये माहिरा खान प्रचंड गर्दीत अडकल्याचं दिसून येतं आहे. तिच्या आजूबाजूला शेकडो लोकांनी गर्दी केल्याच पाहायला मिळत आहे. या गर्दीत ती अडकली असून तिथून कसा तरी बाहेर निघण्याचा प्रयत्न ती करत असल्याचं दिसत आहे. या गर्दीत काही लोकांनी माहिराशी गैरवर्तन केल्याचंही वृत्त आहे. व्हिडिओमध्ये, पाकिस्तानचा ज्येष्ठ अभिनेता हुमायून सईद देखील तिच्या मागे दिसत आहे, जो ही सर्व परिस्थिती पाहून काळजीत असल्याचं दिसत आहे. मात्र गर्दीपासून सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माहिराला घेरलेले दिसत आहे.

गार्डने अचानक तिला पकडल्यानंतर माहिरा खान अस्वस्थ
माहिरा खान तिच्या आगामी ‘लव्ह गुरू’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लंडनला गेली होती. तिथे तिच्यासोबत गर्दीचा फायदा घेत गैरवर्तन झाल्याचं म्हटल जात आहे. व्हिडिओ पाहून असे दिसून येते की हे सर्व लोक तिची एक झलक पाहण्यासाठी तेथून हलण्यास तयारच नव्हते. दरम्यान, गार्डने तिला घट्ट धरलं होत पण यामुळे माहिरा जास्तच अस्वस्थ झाल्याचं दिसत होती.


शाहरुखसोबत डेब्यू
माहिरा खानने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात दिसली होती.2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. शाहरुखसोबतचा तिचा बॉलिवूड डेब्यू यशस्वी झाला होता आणि चित्रपट देखील हिट झाला. हा चित्रपट सुमारे 92 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर त्याने 190.95 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाने जगभरात तब्बल 281.45 कोटी रुपये कमावले.