
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर रोजी पुण्यातील सासवड येथे मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याने मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी विवाह केला झाला. सूरजचा साखरपुडा, हळद आणि लग्न असे सगळे विधी एकाच दिवशी मोठ्या थाटात पार पडले. सूरजच्या या लग्नाला त्याची मानलेली बहिण अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली. सेलिब्रिटी स्टाईल भव्य बार, डेकोरेशन, चाहत्यांची प्रचंड गर्दी आणि बाऊन्सर्सची फौज अशा दिमाखात सूरजचं लग्न उरकलं. आता त्याचा लग्नानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
सूरजच्या लग्नाला चाहत्यांनी स्टेजभोवती एवढी गर्दी केली की नवरा आणि नवरीला देखील फोटो काढण्यासाठीही जागा नव्हती. अनेक सेलिब्रिटींना लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते. पण व्यस्ततेमुळे बरेच जण येऊ शकले नाहीत. एकूणच सूरजच्या लग्नाचा बार दणक्यात उडाला. पण खरी मजा सूरज लग्नकरुन घरी परतल्यानंतर आली आहे. सूरजच्या बहिणींनी अतिशय प्रेमाने संजनाचे नव्या घरात स्वागत केले. संजनाचा गृहप्रवेश झाला. बहिणींनी दोघांचेही औक्षण केले… आणि मग काय? जे झालं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वाचा: पत्रिकेत नाव टाकूनही सूरज चव्हाणच्या लग्नाकडे कोणी-कोणी पाठ फिरवली?
नेमकं काय घडल?
बारामतीत सध्या बोचरी थंडी आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर घरी आलेला सूरज पत्नी संजनासोबत घराच्या मागच्या बाजूला शेकोटी करुन बसला. त्याच्यासोबत त्याच्या बहिणी देखील दिसल्या. नवरा-नवरी तेथेही पूर्ण लग्नाच्या गेटअपमध्ये होते. त्यांनी कपाळावरचे बाशिंगही काढले नव्हतं. दोघेही शेकोटीपाशी हात पसरून बसले होते. तसेच त्यांचे थंडीने गारठलेले चेहरे पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झाले आहे. हा व्हिडीओ सूरजने शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सूरज आणि संजनाच्या लग्नाविषयी
बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण हा सतत चर्चेत राहिला आहे. टिकटॉकवरील रिल्सने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सूरज हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये सहभागी झाला. अतिशय साध्या भोळ्या स्वभावाचा, गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने बिग बॉसचा ताज स्वत:च्या नावे केला. आता सूरजने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.