विराट – जिनिलियाचं कनेक्शन, रातोरात ‘त्या’ गोष्टीवर घातलेली बंदी, नक्की काय आहे प्रकरण?

Virat Kohli and Genelia D'Souza: जनहित लक्षात घेऊन कोणत्या गोष्टीवर बंदी घालण्यात आली, ज्याचं थेट कनेक्शनल विराट - जिनिलिया यांच्यासोबत, नक्की काय आहे प्रकरण... सध्या सर्वत्र चर्चांना उधाण

विराट - जिनिलियाचं कनेक्शन, रातोरात त्या गोष्टीवर घातलेली बंदी, नक्की काय आहे प्रकरण?
फाईल फोटो
| Updated on: Jun 22, 2025 | 11:05 AM

Virat Kohli and Genelia D’Souza: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता विराट अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण एका मुलाखतील अभिनेत्री जिनिलिया डिसूझा माझी क्रश असल्याचं विराटने सांगितलं होतं. दोघांना जाहिरातींमध्ये देखील एकत्र काम केलं. त्यातील एक जाहिरात अशी देखील होती, जी प्रदर्शित होताच रातोरात जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. आज ती जाहिरात यूट्यूबवर उपलब्ध आहे. तर जाणून घेऊ ती जाहिरात कोणती होती आणि तिच्यावर बंदी का घालण्यात आली.

विराट आणि जिनिलिया यांच्या जाहिरातीबद्दल सांगायचं झालं तर, जाहिरातीमध्ये विराट आणि जिनिलिया एका विमानात आहे. विराट पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. तर जिनिलिया फ्लाइट अटेंडंट किंवा एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसते. विराट त्याच्या सह-वैमानिकासह पायलटचा गणवेश घालून विमान उडवताना जाहिरातीत दिसत आहे.

जेव्हा त्याचा सह-वैमानिक उठून वॉशरूममध्ये जातो तेव्हा एअर होस्टेसच्या वेशात जेनेलिया कॉकपिटमध्ये बसलेल्या विराटकडे येते आणि त्यानंतर दोघांमध्ये रोमान्स सुरु होतो. अशात विमात बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशात तेव्हा जनहित लक्षात घेऊन जाहिरातीवर बंदी घालण्यात आली.

दरम्यान, एका रेडिट यूजर ही जाहिरात अशावेळी शेअर केली जेव्हा 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या दुर्दैवी अपघातात तब्बल 270 जणांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. यामध्ये एक प्रवासी चमत्कारीक रित्या बचावला. तर इतर प्रवासी, पायलट आणि क्रू सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या हॉस्पिटल रेसिडेन्सीमध्ये हा विमान अपघात झाला, तिथेही काही डॉक्टरांनी आपले प्राण गमावले.

यावर आता रेडिट युजर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. एक युजर म्हणाला, ‘जाहिरातीवर बंदी घातली चांगलं केलं. नाहीतर अनर्थ झाला असता.’ दुसरा युजर म्हणाला, ‘पूर्वी रस्ते आणि ट्रेन अपघात व्हायचे आणि तर विमान अपघात देखील होत आहेत…’, तिसरा युजर म्हणाला, ‘प्रशासन बेजबाबदार आहे…’ सध्या सर्वत्र जाहिरातीची चर्चा सुरु आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, अहमदाबाद दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 231 डीएनए जुळले आहेत आणि 210 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. मृतांमध्ये 155 भारतीय, 36 ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगीज नागरिक, एक कॅनेडियन आणि नऊ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.