महिलेसोबत लग्न करण्यास काय हरकत? 21 वर्षांपूर्वी जेव्हा रेखा यांनी आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर
Rekha Personal Life: मी एक अपवित्र स्त्री... वासनेने भरलेली..., 21 वर्षांपूर्वी रेखा यांनी आरोपांवर सडेतोड उत्तर दिलं तेव्हा..., रेखा आजही त्यांच्या प्रोफेशनल नाही तर प्रोफेशनल आयुष्यामुळे असतात चर्चेत

Rekha Personal Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आजही त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच जगत आहेत. एक काळ असा होता जेव्हा अफवा पसरल्या होत्या की, ज्या व्यक्तीसोबत रेखा लग्न करतात, त्या व्यक्तीचं निधन होतं. रेखा यांनी वयाच्या 34 व्या वर्षी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी आत्महत्या केली. यापूर्वी रेखा आणि अभिनेते विनोद मेहरा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्या अफवा असल्याचं रेखा यांनी सांगितलं.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरबद्दल संपूर्ण बी-टाउनला माहिती आहे, परंतु त्यांचे प्रेम पूर्ण होऊ शकले नाही. सांगायचं झालं तर, 21 वर्षांपूर्वी रेखा यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. शोमध्ये सेमी ग्रेवाल यांनी रेखा यांना लग्नाबद्दल देखील विचारलं. यावर रेखा म्हणाल्या, ‘एका पुरुषासोबत लग्न? असं विचारत आहात का तुम्ही..’ रेखा यांच्या प्रतिक्रियेवर सेमी ग्रेवाल देखील हैराण झाल्या आणि म्हणाल्या, ‘हो पुरुषासोबत लग्न… महिलेसोबत तर करणार नाही ना लग्न?’ यावर रेखा विनोदी अंदाजात म्हणाल्या, ‘महिलेसोबत लग्न करण्यास काय हरकत आहे…’ रेखा यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आजही रेखा गडगंज संपत्ती असून एकट्या राहतात.
पुढे रेखा म्हणाल्या, ‘मी एक अपवित्र महिला आहे. वासनेनं भरलेली आहे. जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेन की मी स्वतःसाठी आहे, मी स्वतःवर प्रेम करते, मी स्वतःशी, माझ्या व्यवसायाशी आणि माझ्या प्रियजनांशी लग्न केलं आहे.’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.
रेखा यांचं लग्न
रेखा यांनी 4 मार्च 1990 रोजी दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं आणि लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यांतच अभिनेत्रीच्या पतीचे निधन झालं. त्यानंतर रेखा यांचं नाव अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत देखील जोडलं जाऊ लागलं.
रेखाने अक्षय कुमारच्या ब्लॉकबस्टर सिनेमा ‘खिलाडियों का खिलाडी’ मध्ये एका लेडी डॉनची भूमिका साकारली होती. या सिनेमात रेखा आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री उत्तम होती. आज रेखाच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या फक्त बी-टाउन पार्ट्यांमध्येच दिसतात.
