Virat Kohli | गौतम गंभीरवरून नेटकऱ्यांनी विराटची उडवली खिल्ली; अनुष्कासोबतच्या फोटोवर म्हणाले..

क्रिकेटर विराट कोहलीने पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये काही नेटकऱ्यांनी गौतम गंभीरवरून विराटची खिल्ली उडवली आहे. नेमकं काय झालं, ते जाणून घ्या..

Virat Kohli | गौतम गंभीरवरून नेटकऱ्यांनी विराटची उडवली खिल्ली; अनुष्कासोबतच्या फोटोवर म्हणाले..
Anushka Sharma and Virat Kohli
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 17, 2025 | 2:57 PM

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. विराट अनेकदा इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनुष्कासोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. नुकताच त्याने अनुष्कासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विराटने हा फोटो पोस्ट करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे. या फोटोच्या कमेंटमध्ये काहींनी गौतम गंभीरवरून विराटची खिल्ली उडवली आहे. विराटने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काने ऑरेंज कलरचा वन पीस परिधान केला आहे. तर विराटने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. एकीकडे अनुष्का या फोटोमध्ये सुंदर हसत असताना विराटच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव दिसत आहेत. यावरूनच नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘कोहली भावा थोडं हस तरी. अन्यथा लोक म्हणतील की इतका गंभीर का आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘चेहऱ्यावर इतके गंभीर भाव का’, असं सवाल दुसऱ्या युजरने केला. अनेकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनुष्का नुकतीच विराटच्या टीमची मॅच पाहण्यासाठी लखनऊला पोहोचली होती. यावेळी दोघं पती-पत्नी एका मंदिरात देवदर्शनासाठी गेले. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

आयपीएलच्या 16 व्या हंगामात सोमवारी 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात आला. यावेळी आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र आरसीबी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर लखनऊला हे आव्हान झेपलं नाही. लखनऊचा बाजार 19.5 ओव्हमध्ये 108 धावांवर आटोपला. यावेळी लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि आरसीबी बॅट्समन विराट कोहली यांच्यात दुसऱ्या डावातील 17 व्या ओव्हरमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

गौतम गंभीर आणि विराट कोहलीचं तुफान भांडण

नवीन उल हक आणि विराट या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर सामन्याच्या निकालानंतर हे दोघं हस्तांदोलन करताना भिडले. यानंतर या दोघांच्या वादात लखनऊ सुपर जायंट्स टीमचा मेन्टॉर आणि विराट कोहलीचा वैरी असलेला गौतम गंभीरने उडी घेतली. त्यानंतर नवीन उल हक राहिला बाजूलाच. गंभीर आणि विराट यांच्या दोघांमध्ये तुफान वाजलं. आता हे एकमेकांवर हात उगारतात की काय, असंच तो वाद पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं. या सर्व प्रकारानंतर गंभीर आणि विराट या दोघांना एका सामन्याचं मानधनाची रक्कम दंड म्हणून द्यावी लागली. तर नवीन उल हक त्या तुलनेत स्वस्तात सुटला.