
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत जे फार संघर्षाने आणि स्वत:च्या कष्टाने उभे राहिले आहेत. आपल्या अभिनयाने फिल्म इडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख आणि जागा निर्माण केली आहे. यामध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी फार कमी वयात बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. आणि बरेच सुपरहिट चित्रपट आपल्या नावे करू घेतले आहेत. त्यातीलच एक अभिनेता असा आहे की ज्याने फारच कमी वयात आणि फार कमी काळातच बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे.
आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करायची
तसेच या अभिनेत्याने फार संघर्षातून आपलं विश्व उभं केलं आहे. त्याने एका मुलाखतीत त्याने केलेल्या संघर्षाबद्दल सांगितलं. एक काळ असा होता की या अभिनेत्याची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करायची. ती घरोघरी जाऊन काम करायची. आणि या अभिनेत्याने एका मुलाखतीत कोणतीही लाज न बाळगता अगदी अभिमानाने आपल्या आईबद्दल सांगितलं होतं. हा अभिनेता म्हणजे विशाल जेठवा.
वडील नारळ पाणी विकायचे
विशालने त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना सांगितले की तो एका अतिशय साध्या गरीब कुटुंबातील होता. जिथे त्याची लोकांच्या घरी काम करायचीय. एवढंच नाही तर ती सुपरमार्केटमध्ये सॅनिटरी पॅड देखील विकत असे. त्याचे वडील नारळ पाणी विकायचे. या परिस्थितीतून आलेल्या या अभिनेत्याने आपल्या कष्टाने आपली खास ओळख निर्माण केली. आणि आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आईला घेऊन थेट रेड कार्पेटवर
एवढंच नाही तर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘होमबाउंड’ या चित्रपटातून पदार्पण करून त्याने सर्वांचे मन जिंकले. 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘होमबाउंड’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला जिथे प्रेक्षकांनी नऊ मिनिटे उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले. तो कान्समध्ये त्याच्या आईसह आला होता. त्याने आईला रेड कार्पेटवर आणून एक भावनिक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.. यासोबतच, विशालने कान्समधील त्याच्या संस्मरणीय अनुभवही सांगितला.
इंग्रजी बोलणे आणि तिथल्या हाय-प्रोफाइल गर्दीला घाबरला अभिनेता
फिल्म फेस्टिव्हलमध्ये “होमबाउंड” या चित्रपटाद्वारे रेड कार्पेटवर विशालचं पदार्पण म्हणजे त्याच्या कारकिर्दीसाठीच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही अभिमानाचा क्षण होता. शिवाय आईला कान्सला घेऊन जाणे हा त्याच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण होता. विशालने मुलाखतीत सांगितलं की, तो कान्सला जाण्यापूर्वी इतका घाबरला होता की त्याला जाण्याचा विचारही सोडून द्यावासा वाटला. तो विशेषतः घाबरला होता कारण त्याला इंग्रजी बोलणे आणि तिथल्या हाय-प्रोफाइल गर्दीत सहज वाटत नव्हते.
कान्समध्ये चित्रपटाचा प्रीमियर
‘होमबाउंड’ चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील संघर्षांशी खोलवर जोडलेली आहे आणि त्याने त्याच्या भूतकाळातील समस्यांना अभिनयात रूपांतरित करून त्या पात्राला जिवंत केलं आहे. नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.