Vivek Agnihotri | ‘हा’ चित्रपट फुकटमध्ये दाखवत असल्याने विवेक अग्निहोत्री बाॅलिवूडवर भडकले, थेट म्हणाले, विनाश

| Updated on: Jun 09, 2023 | 2:54 PM

विवेक अग्निहोत्री यांच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूडचे चित्रपट आणि काही निर्माते असतात. नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर करत बाॅलिवूडच्या चित्रपटावर निशाणा साधला आहे. आता विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Vivek Agnihotri | हा चित्रपट फुकटमध्ये दाखवत असल्याने विवेक अग्निहोत्री बाॅलिवूडवर भडकले, थेट म्हणाले, विनाश
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या ब्लडी डॅडी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहिद कपूर हा दिसला. ब्लडी डॅडी हा चित्रपट (Movie) आजच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण हा चित्रपट ओटीटीवर फुकटमध्ये बघायला मिळत आहे. ब्लडी डॅडी (Bloody Daddy) हा शाहिद कपूर याचा चित्रपट जियो सिनेमावर प्रेक्षकांना फुकटमध्ये बघायला मिळत आहे. मात्र, ब्लडी डॅडी हा चित्रपट निर्माते फुकटमध्ये का दाखवत आहेत, असा प्रश्न थेट अनेकांना पडलाय. आता यावर समाचार थेट विवेक अग्निहोत्री यांनी घेतला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ब्लडी डॅडी हा चित्रपट फुकटमध्ये दाखवत असल्यामुळे टार्गेट केले आहे. इतकेच नाही तर थेट विवेक अग्निहोत्री यांनी पागलपणाचा हा बिजनेस असल्याचे देखील म्हटले आहे. कारण ब्लडी डॅडी हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 200 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा एक बिग बजेटचा चित्रपट आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, कोणीही 200 कोटींचा चित्रपट फुकट का दाखवेल? हे एक पागलपणाचे व्यवसाय मॉडेल आहे. सर्वात वाईट म्हणजे बाॅलिवूड हे स्वतःच्या विनाशाचा आनंद साजरा करत आहे. आता विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

विवेक अग्निहोत्री यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने या पोस्टवर कमेंट करत म्हटले की, हे सर्व जियो बिझनेसचे मॉडल आहे, अगोदर सर्व काही फुकटमध्ये द्यायचा लोकांना सवय होऊ द्यायची आणि मग थेट सर्व काही वसूल करायचे. एकाने लिहिले की, ओटीटी हे जाहिरात फ्री करणे फार जास्त गरजेचे आहे.

अजून एकाने कमेंट करत म्हटले की, मला वाटते की, ब्लडी डॅडीचे चित्रपट निर्माते हे जाहिरातीमधून 200 कोटी रूपये नक्कीच काढतील. मात्र, जियो सिनेमावर शाहिद कपूर याचा चित्रपट फुकटमध्ये बघायला मिळत असल्याने प्रेक्षकांची चांदी झाली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी अनेकांनी शाहिद कपूर याचे काैतुक केले आहे. धमाकेदार प्रतिसाद प्रेक्षक या चित्रपटाला देत आहेत.