ज्याला ऐश्वर्याने नाकारलं, बॉलिवूडमध्ये पडला एकटा; त्याने आता दुबईत उभारला 1200 कोटींचा बिझनेस

एकेकाळी हा अभिनेता बॉलिवूडमध्ये एकटा पडला होता. ऐश्वर्या रायसोबतचं अफेअर आणि ब्रेकअप चर्चेत होतं. प्रतिभावान असूनही त्याला प्रोजेक्ट्स मिळत नव्हते. आता तोच अभिनेता दुबईत स्थायिक झाला असून तिथे 1200 कोटींचा बिझनेस करतोय.

ज्याला ऐश्वर्याने नाकारलं, बॉलिवूडमध्ये पडला एकटा; त्याने आता दुबईत उभारला 1200 कोटींचा बिझनेस
Vivek Oberoi and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2025 | 9:44 AM

या अभिनेत्याने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्याचा खूप मोठा तरुण आणि महिला चाहतावर्ग निर्माण झाला. अवघ्या काही वर्षांतच त्याने इंडस्ट्रीत आपली छाप सोडली. परंतु अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतच्या अफेअरमुळे तो सर्वाधिक चर्चेत आला. या दोघांची लव्ह-स्टोरी जितकी रंजक होती, त्यापेक्षा जास्त त्रासदायक त्यांचा ब्रेकअप होता. एव्हाना तुम्हाला समजलंच असेल की हा अभिनेता कोण आहे? तर त्याचं नाव आहे विवेक ओबेरॉय. आता या अभिनेत्याने भारत सोडून दुबईत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. कोविड महामारीच्या काळातच विवेकने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हे पाऊल उचललं होतं.

युट्यूब चॅनल ‘Owais Andrabi’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणाला, “दुबई, ही बिझनेस फ्रेंडली जागा आहे. इथलं वातावरणसुद्धा चांगलं आहे. इथे येऊन मी खूप पैसा कमावला आहे. जर एखाद्या व्यक्तीला इथे येऊन पैसे कमवायचे असतील, तर त्याला इथले नियम पाळावे लागतील. स्थानिक कस्टम्सच्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि इथल्या संस्कृतीला समजून घ्यावं लागेल. हे सर्व केल्यास त्याला इथे कोणताच त्रास होणार नाही. त्याला कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही. माझ्या वडिलांनी मला सेल्स, अकाऊंट्स यांना चांगल्या पद्धतीने हाताळायला शिकवलं आहे.”

‘फोर्ब्स इंडिया’च्या रिपोर्टनुसार, विवेक आर्थिकदृष्ट्या आता पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झाला आहे. विवेक म्हणाला, “जेव्हा मी 12-13 वर्षांचा होता, तेव्हा प्रत्येक उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मी बिझनेसची तत्त्वे शिकत होतो. एखाद्या गोष्टीला कसं विकायचं आणि ग्राहकाकडून त्याबद्दलचा फीडबॅक कसा घ्यायचा आणि त्यात सुधारणा कशी करायची.. हे सर्व मी तेव्हापासून शिकलोय. स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगबद्दलही मला खूप आधीपासूनच माहिती मिळाली होती. रिअल इस्टेटमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करायची, हे मी समजून घेतलं होतं. पण यातसुद्धा तुम्ही योग्य लोकांसोबत मिळून काम केलं, तरच तुम्हाला फायदा होईल.”

विवेकने 2010 मध्ये प्रियांका अल्वाशी लग्न केलं. हे त्याचं अरेंज मॅरेज होतं. मात्र त्यापूर्वी त्याचं नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. त्यापैकी ऐश्वर्यासोबतचं त्याचं अफेअर विशेष चर्चेत होतं.