News9 Global Summit: तेव्हाच जग तुमची किंमत करेल जेव्हा.., विवेक ओबेरॉयने सांगितला सक्सेस मंत्र
टीव्ही9 नेटवर्कच्या न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी हजेरी लावली. या जागतिक वैचारिक मंचावर त्यांनी 'द सेकंड अॅक्ट' या विषयावर भाष्य केलं. या आयोजनाची थीम आहे "भारत-यूएई: समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी"

भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क टीव्ही9 च्या आंतरराष्ट्रीय न्यूज9 ग्लोबल समिटचा शुभारंभ आज, गुरुवारी दुबईत झाला. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि गेल्या 23 वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग असलेला तसेच व्यवसायाच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलेला उद्योजक विवेक ओबेरॉय या समिटमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याने TED शैलीत ‘द सेकंड अॅक्ट’ या विषयावर बोलताना सांगितलं की व्यवसायाच्या क्षेत्रातही यश कसं मिळवलं. त्याने सांगितलं की आपण नेहमी मूल्य निर्माण करावं, त्याच्याद्वारेच आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या धेय्यापर्यंत पोहोचू शकतो.
या मंचावर विवेक ओबेरॉय म्हणाला की, जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही मूल्य निर्माण करत आहात, तेव्हाच जग तुमचा आदर करेल. तेव्हाच जग तुमची किंमत करेल. मग ते मूल्य आर्थिक दृष्टिकोनातून असो, सन्मानाच्या दृष्टिकोनातून असो किंवा स्थानाच्या दृष्टिकोनातून असो. जेव्हा तुम्ही मूल्य निर्माण कराल, तेव्हाच जग तुमची किंमत करेल. विवेक म्हणाला की ‘द सेकंड अॅक्ट’ म्हणजे स्वतःला पुन्हा परिभाषित करणं.
नेहमी आपल्या अंतर्मनातील आवाज ऐका – विवेक
त्याने सांगितलं की, तुम्ही जिथे आहात तो तुमच्या प्रवासाचा अंत नाही. तुम्ही ज्या प्रवासावर आहात ते तुमचे धेय्य नाही. तुम्हा सर्वांमध्ये तुमचा प्रवास निवडण्याची आणि तुमची दिशा ठरवण्याची ताकद आहे. पण अनेकदा असं होतं की आपण गोंधळात हरवून जातो. तो गोंधळ आपल्याला सांगतो की आपण कुठे असायला हवं होतं, तो गोंधळ आपल्याला आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकू देत नाही, जो आवाज आपल्याला मार्गदर्शन करतो.
विवेकने आपल्या बोलण्यातून हे समजावण्याचा प्रयत्न केला की, जर आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असेल, काहीतरी साध्य करायचं असेल, तर आपण मूल्य निर्माण करत राहावं आणि आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकत राहावं. मग आपल्या आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरी.
‘व्हिजन इन मोशन’ आहे दुबई
या कार्यक्रमात टीव्ही9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी दुबईला ‘व्हिजन इन मोशन’ असं संबोधलं. कार्यक्रम सुरू करताना ते म्हणाले, “जर तुम्ही याबद्दल विचार केला तर मानवजातीची कहाणी ही एकाच गोष्टीबद्दल आहे, ती म्हणजे दररोज काहीतरी चांगलं करण्याची इच्छा. सर्वप्रथम व्हिजन आवश्यक आहे. त्यानंतर त्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी धैर्य आणि बांधिलकी हवी. मी जेव्हा दुबईत येतो, तेव्हा मला याची आठवण होते. या शहराला मी ‘व्हिजन इन मोशन’ म्हणतो.”
