
Bigg Boss 18 Winner: बिग बॉसचा शेवट म्हणजे शोच्या निर्मात्यांसाठी टीआरपीची सर्वात मोठी संधी आणि शोच्या चाहत्यांसाठी निर्णयाचा क्षण. शोच्या विजेत्याचं नाव घोषित झाल्यानंतर विजेता स्पर्धकाचे चाहते आनंदी होतील. पण ज्या स्पर्धकांना शेवटच्या क्षणी हार स्वीकारावी लागेल त्या स्पर्धकांच्या चाहत्यांमध्ये निराशा दिसून येणार आहे. कोणता स्पर्धक ट्रॉफी घरी घेऊन जाईल हे पूर्णपणे प्रेक्षकांवर अवलंबून आहे. ‘बिग बॉस 18’ च्या शेवटच्या टप्प्यात करणवीर मेहरा, रजत दलाल, विवियन डीसेना, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे स्पर्धक आहेत.
टॉप 6 मधील टॉप 3 स्पर्धांची निवड प्रेक्षकांनी केली आहे. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या फिनालेपूर्वी सोशल मीडियावर चाहते आणि युजर्समध्ये चर्चा सुरु झाली आहे. पण असे अनेक चाहते आहेत जे टॉप 3 मध्ये विवियन डिसेना, करणवीर मेहरा आणि रजत दलाल यांना पाहत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिग बॉस शोने सुरुवातीलाच दावा केला होता की, विवियन टॉप 2 मध्ये नक्की असेल. शिवाय विवियन बिग बॉसचा लाडका असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. बिग बॉसच्या अनेक गोष्टी विवियनच्या बाजूने होत्या.
तर दुसरीकडे करणवीर मेहरा याचा बोलबाला सामान्य जनतेमध्ये आहे. करण याने त्याच्या गेमने चाहत्यांना गुंतवून ठेवलं. घरात करणवीरच्या मित्रांनी त्याची फसवणूक केली. पण त्याने कधीच मैत्री तोडली नाही. त्यामुळे आता ‘बिग बॉस 18’ ची ट्रॉफी करणवीर याला मिळणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रजत दलाल के पास फैन्स का सपोर्ट इन्फ्लुएंसर आहे आणि एल्विश यादव देखील त्याचा मित्र आहे. त्यामुळे रजत याचं विजेता म्हणून नाव घोषित होऊ शकतं… अशी देखील चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 18’ च्या ग्रँड फिनालेची चर्चा रंगली आहे.