Bollywood Quiz : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा, शाहरुख-ऐश्वर्यासोबतही केलं काम, तरीही ठरला फ्लॉप; अखेर अभिनयाला रामराम, आता जगतो…
बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक असूनही, या स्टार किडला करिअरमध्ये मोठं यश मिळ शकलं नाही. वडील प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही त्याच्या करिअनरने फार झेप घेतली नाही. अभिनेता म्हणून आपली ओख निर्माण करण्यासाठी कित्येक वर्ष स्ट्रगल करूनही तो अयशस्वी ठरला, अखेर त्याने चुपचाप इंडस्ट्री सोडली.

बॉलिवूडवर अनेकदा नेपोटिज्म अर्थात घराणेशाहीचा आरोप झाला आहे. 2025 मध्ये देखील अनेक स्टार किड्सनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली, त्यापैकी काही हिट झाले तर काही फ्लॉप ठरले. आज आपण अशा एका स्टारकिड बद्दल जाणून घेणार आहोत, जो बॉलिवूडच्या सर्वात प्रभावशाली कुटुंबातून आला आहे. या स्टारकिडने 2000 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केलं. पण प्राभवशाली कुटुंब किंवा ब्लॉकबस्टर फिल्ममधून पदार्पण करूनही त्याचं करिअर वाचवू शकले नाहीत.
खरंतर या स्टार किडने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले,पण तरीही तो स्टारडम मिळवू शकला नाही आणि अखेर तो स्वतःच अभिनयापासून दूर गेला. हा अभिनेता दुसरा -तिसरा कोणी नव्हे तर तो प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा उदय चोप्रा. विख्यात निर्मात-दिग्दर्शक आदित्य चोप्राचा तो धाकटा भाऊ आहे. आता उदय चोप्रा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या तो करतो तरी काय?, चला जाणून घेऊया.
मोहब्बतेंमधून डेब्यू
उदय चोप्राने 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून पदार्पण केले यामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट उदयचा मोठा भाऊ आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला होता आणि बॉक्स ऑफीसवर चित्रपट खूप यशस्वी ठरला. पण त्याचा उदय चोप्राच्या करिअरला फार काही फायदा झाला नाही. यानंतरही उदय चोप्राने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्याला कधीही एकही सोलो हिट चित्रपट मिळाला नाही. परिणामी, अनेक हिट चित्रपटांचा भाग असूनही, तो फारसा प्रसिद्धी मिळवू शकला नाही.
डिप्रेशनमध्ये गेला उदय चोप्रा
बॉक्स ऑफिसवरच्या सलग अपयशानंतर, उदय चोप्रा निराश झाला आणि नैराश्यात गेला. त्याने त्याचे भावनिक संघर्ष कधीही लपवले नाहीत. उदय चोप्राने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. पोस्टमध्ये तो कामाच्या कमतरतेबद्दल आणि नैराश्याबद्दल बोलला होता. एकेकाळी आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचेही त्याने कबूल केलं. मात् काही काळाने त्याने ही पो्ट डिलीट केली होती.
‘द रोमँटिक्स’ मध्ये दिसला उदय चोप्रा
उदय चोप्रा हा शेवटचा ‘द रोमँटिक्स’ या माहितीपट मालिकेत दिसला होता, ही यश चोप्रा आणि यशराज फिल्म्सवर आधारित एक डॉक्यूमेंट्री सीरिज होती. उदय चोप्रा बऱ्याच काळानंतर द रोमँटिक्समध्ये पडद्यावर दिसला. वैयक्तिक आयुष्यात अनेक रिलेशनशिप झाल्या, मात्र 52 व्या वर्षीही उदय अजून सिंगलच आहे. ‘नील एन निक्की’ चित्रपटादरम्यान त्याचे नाव तनिषा मुखर्जीशी जोडले गेले होते, परंतु नंतर दोघेही वेगळे झाले. उदय चोप्रा कदाचित मोठ्या पडद्यावरून गायब झाला असला तरी तो चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. यश चोप्रा यांनी स्थापन केलेल्या यश राज फिल्म्स एंटरटेनमेंटचे तो सीईओ आहे. याशिवाय, उदयचे अनेक व्यवसायिक उपक्रम आहेत, ज्यात टेक गुंतवणूक आणि कॉमिक कंपनी योमिक्सचा समावेश आहे.
11 चित्रपटांत केलं काम
उदय चोप्रा याने त्याच्या कारकिर्दीत सुमारे 11 चित्रपटांमध्ये काम केले, परंतु तो स्वतःहून एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. ‘मोहब्बतें’ आणि ‘धूम’ सारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या उपस्थितीने सर्वांचे मनोरंजन केले, परंतु त्याचे श्रेय त्याला मिळालं नाही. उदय चोप्रा याची चित्रपट कारकिर्द यशस्वी झाली नसली तरी, व्यावसायिक जगात तो एक स्टार आहे आणि आलिशान आयुष्य जगतो. कमाईच्या बाबतीत, तो बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सपेक्षा खूप पुढे आहे.
