सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक, कोणी केलं त्याच्या कामाचं कौतुक? मोठी माहिती समोर
Bigg Boss 18: सैफ अली खान हल्ला प्रकरणाला नवं ट्विस्ट... अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्या हल्लोखोराचं कौतुक कोणी केलं? अणखी एक व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी... ठाणे येथून सैफ अली खान याच्या हल्लेखोराल अटक केली आहे. आता त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

Bigg Boss 18: अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरु केला. शनिवारी ठाण्यातून आरोपी शहाजाद याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरु केली आहे. आता देखील संबंधित प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेहजाद दादरहून वरळीला गेला होता. शहाजाद वरळीतील एका हॉटेलमध्ये यापूर्वी कामाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याने सकाळी हॉटेलमध्ये नाष्ता केला. शिवाय अभिनेत्याने जीपेने पैसे दिले. तिथून पून्हा आरोपी शहाजाद हा दादरला आला. आरोपी दादरहून ठाण्याला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
मोहम्मद शेहजाद हा ठाण्यातील देखील एका हॉटेलमध्ये काम करत होता. याच हॉटेलमध्ये चांगलं काम केल्यामुळे त्याचं कौतुकही करण्यात आलं होतं. पांडे नावाच्या एका व्यक्तीने त्याला हॉटेलमध्ये कामासाठी ठेवलं होतं. अशात पोलिसांनी पांडे याला देखील ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणात पांडे या व्यक्तीचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे.
आतापर्यंत याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अभिनेत्री करीना कपूर हिचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. शिवाय सैफ याच्या घरात काम करणाऱ्या स्टाफचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. आता आरोपीला अटक झाली असून चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
आरोपी हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये राहत होता.
धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीच्या निशाण्यावर जेह अली खान असल्याची देखील चर्चा रंगली आहे. मदतनीस एलियामा फिलिप्स यांनी जेहच्या खोलीत हल्लेखोराला पाहिलं होतं. दरम्यान एलियामा फिलिप्स यांनी पोलिसांना घडलेली सर्व घटना सांगितली. आरोपीने फिलिप्स याच्यावर हातावर चाकूने वार केला.
एलियामा फिलिप्स यांच्या जबाबानंतर हल्लेखोर मुलाचा ताबा घेऊन पैशांची मागणी करणार होता… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आरोपी जेहच्या बेडजवळ येताना फिलिप्स यांना दिसला होता. पोलिसांना मिळालेल्या अनुषंगाने आता तपास सुरु आहे. जोपर्यंत पोलीस चौकशीतून चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत.. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
