Akshaye Khanna Dhurandhar : 50-60 नावं चर्चेत, सगळीकडे शोधलं.. मग अक्षय खन्ना कसा बनला ‘रेहमान डकैत’ ?
Dhurandhar Film : रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, सारा अर्जुन यांची प्रमुख भूमिका असलेला 'धुरंधर' सगळीकडे गाजतोय. त्यातील सर्वांच्याच कामाची खूप चर्चा आहे. पण या रेहमान डकैत बनलेल्या अक्षय खन्नाची सध्या विशेष तारीफ होत आहे. त्याची निवड कशी झाली माहित्ये ?

Mukesh Chhabra on Dhurandhar Casting : आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट सगळीकडे गाजत असून बॉक्स ऑफीसवरही तगडं कलेक्शन केलं आहे. अवघ्या 10 दिवसांतच चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा सहज गाठला असून येत्या काळात चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहणार असल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि त्यातील पात्रांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे, त्याच्या कलाकारांबद्दल चर्चा न करणं हे तर कठीणच ठरेल.
या चित्रपटाचा कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान फिल्मच्या कास्टिंगबद्दल विस्ताराने सांगितलं. या चित्रपटासाटी एक-एक भूमिकेसाठी कित्येक कलाकारांबद्दल चर्चा झाली, त्यंची निवड कशमी झाली हेही त्यांनी अगदी विस्तृतपणे सांगितलं. एवढंच नव्हे तर या पिक्चरमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा होत्ये, त्या रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्नाबद्दलही (Akshaye Khanna) त्यांनी मोठा खुलासा केला. या रोलसाठी अ7य हा महिली चॉईस नव्हता, असंही मुकेश यांनी नमूद केलं.
चित्रपटाबद्दल बोलताना धुरंधरचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा म्हणाले, “मी नेहमीच लोकांना आश्चर्यचकित कसं करावं आणि कास्टिंग अधिक मनोरंजक आणि मजेदार कसं बनवायचं याचा विचार करतो. मला या चित्रपटातही तेच करायचं होतं. लोक या चित्रपटातील ट्विस्ट स्वीकारत होते, म्हणून मला कास्टिंगमध्ये एक ट्विस्ट आणायचा होता. चित्रपटातील कलाकारांची निवड पाहिल्यानंतर कोणालाही असंच, सहज, रँडम घेतलेलं नाही, कलाकारांच्या निवडीसाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे असं लोकांना वाटलं पाहिजे, असा विचार होता ” असं मुकेश छाब्रा म्हणाले.
2-4 तास व्हायची कास्टिंगवर चर्चा
या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेच्या कास्टिंगसाठछी, निवडीसाठी आम्ही बराच वेल घेतला. कोणत्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता सर्वात जास्त फिट, योग्य वाटेल याचाच आमच्या डोक्यात सतत विचार होता. चित्रपटात प्रत्येक अभिनेत्याला फायनल करण्यापूर्वी जोरदार चर्चा व्हायची, खूप वाद घालायचो आम्ही. या चित्रपटासाठी संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन सुटेबल ठरतील की नाही, याचीच आम्ही चर्चा करायचो. आम्ही आणि आदित्या धर 2-4 तास बसायचो आणि प्रत्येकाची निनड योग्य ठरेल की नाही, ते वर्क होील की नाही, फक्त यावरच बोलत असायचो. लोकांना कशा पद्धतीने सरप्राईज करता येईल ? या लोकांऐवजी इतर कोणालाही या भूमिकेसाठी घेता येईल का ? असे विचार असायचे डोक्यात. सुरुवातीला, या चित्रपटासाठी आमच्या मनात काही चेहरे होते ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी केली होती, परंतु नंतर आम्ही चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठी नावं निवडली असं ते म्हणाले.
सोपी नव्हती रेहमान डकैतची निवड
मुकेश छाब्रां यांनी पुढे सांगितलं की, सर्वाधिक वेळ हा रेहमान डकैतच्या कास्टिंगसाठी अभिनेता निवडण्यात गेला. या भूमिकेसाठी 50-60 कलाकारांची चर्चा झाली होती, त्यापैकी बरेच जण दक्षिणेतील होते. पण छावा, हमराज, बॉर्डर आणि दिल चाहता है मधलं काम पाहता, अक्षय खन्ना याचीच रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी फयानली निवड करण्यात आली. कोणाला कास्ट करायचे आहे हे निवडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तरच तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता. हा निर्णय असा अचानक घेता येत नाही असं मुकेश छाब्रा यांनी नमूद केलं.
