
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जहीर इकबालसोबत लग्न केल्यापासून तिच्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चर्चेत आहे. सतत ट्रोलर्स तिला ट्रोल करताना दिसतात. पण अभिनेत्रीने अनेक प्रसंगी त्यांना चोख उत्तरही दिले आहे. तसेच सोनाक्षी पती जहीर आणि सासू-सासऱ्यांसोबतच्या बॉन्डिंगबाबतही खुलेआम बोलते. आता तिने खुलासा केला आहे की लग्नापूर्वी जहीरने तिला सासरच्या लोकांपासून वेगळे राहण्याचा पर्याय दिला होता. तसेच तिने लग्नानंतर लगेच गर्भवती असल्याच्या अफवांविषयी वक्तव्य केले आहे.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सोनाक्षी प्रेग्नंट?
कॉमेडियन भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये सोनाक्षी सिन्हाने नुकताच हजेरी लावली. तिने अनेक खासगी गोष्टींवर वक्तव्य केले आहे. प्रेग्नंसीच्या चर्चांविषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली की, माझे वजन थोडे वाढले की लगेच मी प्रेग्नंट असल्याचे म्हणतात. मला गेल्या 16 महिन्यांपासून प्रेग्नंट बनवत आहेत. माझे जसे लग्न झाले दुसऱ्या दिवशी माझे वडील चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. चेकअपसाठी. मी आणि जहिर पप्पांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे आमचे फोटो काढले. त्यादिवसापासून मी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. याचा अर्थ मी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रेग्नंट असल्याचे बोलले जाऊ लागले.
जहीरने विचारले होते- तुला वेगळे राहायचे आहे का?
सोनाक्षी म्हणाली की सर्वजण खूप चिल आणि मजेशीर आहेत. आम्ही खूप जवळच्या कुटुंबासारखे आहोत. अभिनेत्रीने सांगितले की जहीरने लग्नापूर्वी मला विचारले होते की तुला वेगळे राहायचे आहे का? तुला स्वतःचे घर हवे आहे का? यावर मी नकार दिला. सोनाक्षी म्हणाली की मी यावर उत्तर दिले की नाही. मी त्यांच्यासोबत राहीन, तुला जायचे असेल तर तू जा. मी मॉम आणि डॅडसोबत राहीन. ते खूप चांगले आहेत.
सोनाक्षीच्या सासूलाही येत नाही स्वयंपाक
पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने हेही सांगितले की ना तिला आणि ना तिच्या सासूला स्वयंपाक येतो. सोनाक्षी म्हणाली, “मी अजिबात स्वयंपाक करत नाही. माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते. त्यांची नेहमीची तक्रार असते की त्यांच्या मुलीला स्वयंपाक येत नाही. माझ्या सासूला पण स्वयंपाक येत नाही. त्या म्हणतात की काळजी करू नको, तू योग्य घरात आली आहेस. त्यांनी सांगितले की मला खाण्याची आवड आहे, पण बनवण्याची नाही.”
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर सोनाक्षी सिन्हा लवकरच सुपरनॅचरल थ्रिलर ‘जटधरा’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटात तिच्यासोबत सुधीर बाबू आणि शिल्पा शिरोडकरही काम करताना दिसतील.