
Academy Awards 2026 : जगभरात दररोज चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र, काही चित्रपट असे असतात की त्यांची कथा प्रेक्षकांना इतकी आवडते की प्रेक्षक बघण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. असाच एक हॉरर चित्रपट ज्याची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने 3255 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने ‘टायटॅनिक’ चित्रपटाला टक्कर दिली आहे. अशातच आता या चित्रपटाला 16 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. कोणता आहे हा चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो बॉलिवूड चित्रपट नसून तो हॉलिवूड चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही पाहिलं असेल की, हॉलीवूडमधील हॉरर चित्रपटांना सहसा ऑस्करमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही. मात्र, यंदा हे धोरण बदलताना दिसत आहे. ‘सिनर्स’ हा हॉलीवूड हॉरर चित्रपट सध्या ऑस्करच्या शर्यतीत सर्वात पुढे असून, 98व्या अकादमी अवॉर्डसाठी तब्बल 16 नामांकने मिळवत या चित्रपटाने इतिहास रचला आहे.
याआधी ‘ऑल अबाउट ईव्ह’, ‘टायटॅनिक’ आणि ‘ला ला लँड’ या चित्रपटांच्या नावावर 14-14 नामांकनांचा विक्रम होता. मात्र ‘सिनर्स’ने हा विक्रम मोडत सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रायन कूगलर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला बेस्ट डायरेक्शन, बेस्ट स्क्रीनप्ले यांसह अनेक महत्त्वाच्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
ओटीटीवर कुठे पाहता येईल ‘सिनर्स’?
जर तुम्हाला हा हॉरर चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता आला नसेल तर तुम्ही आता काळजी करण्याचं कारण नाही. ‘सिनर्स’ हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा चित्रपट सध्या हिंदी भाषेत उपलब्ध नसला तरी इंग्रजी ऑडिओसह सबटायटल्सच्या मदतीने प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.
‘सिनर्स’ला ऑस्करमध्ये कोणकोणती नामांकनं?
‘सिनर्स’ला फक्त अभिनय आणि दिग्दर्शनापुरते मर्यादित न ठेवता, तांत्रिक विभागातही मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली आहे. चित्रपटाला खालील श्रेणींमध्ये ऑस्कर नामांकन मिळाले आहेत.
सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स, साउंड प्रोडक्शन, प्रॉडक्शन डिझाइन, एडिटिंग, कास्टिंग, कॉस्च्युम डिझाइन, म्युझिक आणि स्कोअर, मेकअप आणि हेअर स्टाइल. अनेकदा हॉरर चित्रपटांना ऑस्करमध्ये दुर्लक्षित केलं जातं. मात्र, गेल्या वर्षी ‘द सब्स्टन्स’ आणि यंदा ‘सिनर्स’ला मिळालेल्या नामांकनांमुळे ही मानसिकता बदलताना दिसत आहे.