Mithun Chakraborty : थलपती विजयनंतर आता मिथुन चक्रवर्तीही राजकारणात महत्वाच्या भूमिकेत, सरकारमध्ये मिळाली मोठी जबाबदारी

Mithun Chakraborty : थलपती विजयनंतर मिथुन चक्रवर्ती आता राजकारणात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून सरकारनं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Mithun Chakraborty : थलपती विजयनंतर आता मिथुन चक्रवर्तीही राजकारणात महत्वाच्या भूमिकेत, सरकारमध्ये मिळाली मोठी जबाबदारी
| Updated on: Oct 07, 2026 | 8:56 PM

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय राजकारणातील एन्ट्रीमुळे चर्चेत आलेला. अभिनेता आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनला आहे. अशातच आता थलपती विजयनंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारने अभिनेते-राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना एक महत्त्वपूर्ण भूमिका दिली आहे. त्यांची पश्चिम बंगाल सरकारमध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची भूमिका माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित असेल. या पदाला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होईल आणि पुढील आदेशापर्यंत सुरू राहील.

मिथुन चक्रवर्ती राजकारणात सक्रिय

Loading...

मिथुन चक्रवर्ती हे बंगालच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत आणि त्यांनी भाजपसाठी प्रचार केला आहे. आता, त्यांची भूमिका राज्य सरकारमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभाग राज्यातील माहिती, संस्कृती आणि कला यांचे पर्यवेक्षण करतो. मिथुन यांची या विभागात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मिथुन चक्रवर्ती आता माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागात सल्लागार म्हणून काम पाहतील. यापूर्वी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याकडे या विभागाची जबाबदारी होती. आता त्यांची सरकारमध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची भूमिका विभागाशी संबंधित बाबींवर सरकारला सल्ला देण्याची असेल.

सरकारी अधिसूचनेनुसार, ही नियुक्ती तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे आणि पुढील आदेशापर्यंत सुरू राहील. या नवीन जबाबदारीसोबतच मिथुन यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही देण्यात आला आहे. अशाप्रकारे, मिथुन चक्रवर्ती आता पश्चिम बंगाल सरकारमध्ये सल्लागार म्हणून काम पाहतील.

मिथुन चक्रवर्ती यांचे सिनेमे

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘डिस्को डान्सर‘, ‘फुल और अंगार‘, ‘भूत बंगला‘, ‘एंटरटेन्मेन्ट‘, ‘प्रेम प्रतिज्ञा‘, ‘गुंडा‘, ‘ओ माय गॉड‘, ‘महागुरू‘, ‘कमांडो‘, ‘तडीपार‘, ‘जंग‘, ‘मुजरीम‘, ‘आदमी‘, ‘लोहा‘, ‘शानदार‘, ‘गोलमाल 3′ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us