रात्रीच्या वेळी सापांना घरापासून दूर कसं ठेवावं? सर्पमित्रांनी सांगितली खास ट्रिक
भारतामध्ये सापांच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्या विशेषत: सकाळी बिळामध्ये दडून बसतात, आणि रात्रीच्या वेळी शिकारीसाठी सक्रिय होतात. रात्रीच्या वेळी अशा सापांना घरापासून दूर कसं ठेवावं, यासाठी सर्पमित्रांनी काही खास ट्रिक सांगितल्या आहेत.

भारतामध्ये हजारो सापांच्या प्रजाती आढळून येतात, प्रत्येकाच्या सवयी आणि वैशिष्टे वेगवेगळी असतात. काही साप हे अत्यंत लाजाळू असतात, ते कधीही कोणावर हल्ला करत नाहीत. ते मानसापासून दूर निघून जातात. परंतु काही साप असे देखील असतता, जे प्रचंड आक्रमक असतात. ते तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतात. त्यामुळे अशा सापांना कधीही पकडण्याचा प्रयत्न करू नये. तुमच्या घरामध्ये किंवा परिसरात कधीही साप आढळला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित जागी सोडतील. ज्याप्रमाणे सापांचा स्वभाव हा वेगवेगळा असू शकतो, त्याच प्रमाणे त्यांच्या सवयी देखील वेगवेगळ्या असतात.
जसं की काही साप हे दिवसा शिकार करतात आणि रात्री बिळात दडून बसतात. अशा सापांपासून फार धोका नसतो कारण हे साप दिवसाच्या उजेडामध्ये लगेच दिसून येतात. परंतु असे देखील काही साप असतात, जे दिवसा बिळात आराम करतात, आणि रात्रीच्या अंधारामध्ये शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. अशा सांपापासून निर्माण होणारा धोका हा जास्त असतो, कारण अनेकदा अंधारामुळे असे साप दिसून येत नाहीत. तसेच आपण झोपेत असताना देखील हे साप आपल्याजवळ येऊ शकतात. या सापांपासून आपलं संरक्षण कसं करावं? यासाठी सर्पमित्रांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत.
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रात्रीच्यावेळी जर तुम्ही मोकळ्या मैदानात किंवा तुमच्या घराच्या अंगणात झोपणार असाल तर कधीही खाली जमिनीवर झोपू नका, बाज किंवा पलंगाचा वापर करा. तुम्ही तुमच्या घराच्या बेडवर कधीही रंगीबेरंगी किंवा काळं बेडशिट अंथरू नका, कारण अशा बेडशिटवर साप लवकर दिसून येत नाहीत. त्याऐवजी जर तुम्ही पांढऱ्या बेडशिटचा वापर केला तर त्यावर साप लगेच दिसून येतात.
तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर अशा ठिकाणी घरांमध्ये साप शिरण्याचं प्रमाण जास्त असतं, अशावेळी जर तुमच्या घरात घुशीची किंवा उदरांची बिळं असतील तर ती तशीच सोडून देऊ नका, त्या बिळांना कायम स्वरुपी बुजून टाका. तसेच तुमच्या घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.
