सनी देओल याने मुस्लीम भूमिका साकारल्यानंतर काय झालं? ‘बंटवारा 1947’ सिनेमा फ्लॉप होताच, शबाना आझमी यांचा रोखठोख प्रश्न…
अभिनेता सनी देओल याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमीका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि चाहत्यांनी देखील अभिनेत्याला डोक्यावर घेतलं. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शबाना आझमी यांनी रोखठोक प्रश्न विचारला आहे, सध्या सर्वत्र त्यांच्या प्रश्नाची चर्चा सुरुर आहे.

अभिनेता सनी देओल स्टारर ‘बंटवारा 1947’ सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सांगायचं झालं तर, सनी देओल स्टारर ‘बंटवारा 1947’ सिनेमा आणि अभिनेता इमरान हाश्मी स्टारर ‘आवारापन 2’ सिनेमा एकत्रच प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमात दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी दमदार भूमिका साकारली आहे. शबाना आझमी ‘आवारापन 2’ सिनेमाला मिळालेल्या यशासाठी आनंदी आहे. पण ‘बंटवारा 1947’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला याचं देखील त्यांना दुःख आहे. यावर त्यांनी निराशा देखील व्यक्त केली. दरम्यान, सनी देओलला मुस्लिम भूमिकेत स्वीकारणं प्रेक्षकांना का कठीण गेलं? असा प्रश्न शबाना आझमी यांनी उपस्थित केला.
सिनेमावर काय म्हणाल्या शबाना आझमी?
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, ‘‘बंटवारा 1947’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार वाईट कामगिरी केली. मला त्या लोकांनी घेरलं आहे, जे माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, आम्हाला सिनेमा आवडला आहे आणि सिनेमातून जो संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तो देखील मला आवडला आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक सिनेमाघरात सिनेमा पाहण्यासाठी आलेच नाही. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे…’
शबाना आझमी यांनी उपस्थित केला प्रश्न?
पुढे शबाना आझमी म्हणाल्या, नी देओलला मुस्लिम भूमिकेत स्वीकारणं प्रेक्षकांना का कठीण गेलं? ‘कुली’ सारख्या सिनेमात तर, महानायक अमिताभ बच्चन यांनी मुस्लीम भूमिका साकारलेली. 786 लावून द्यायचे आणि प्रेक्षकांनी त्यांचा स्वीकार देखील केला. आता असं वातावरण निर्माण केलं जात आहे की, ज्यात भेदभाव होत आहे, या वस्तुस्थितीचा आपण काय अर्थ लावायचा?
शबाना आझमी यांनी दिलं स्पष्टीकरण
शेवटी शबाना म्हणाल्या, “भारत-पाकिस्तानचा मुद्दा हा आता हिंदी चित्रपटसृष्टीत असा विषय बनला आहे ज्याला हातही लावला जात नाही. हे खूप निराशाजनक आहे, कारण हा सिनेमा कोणत्याही दृष्टीने राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह नाही. यात तुम्हाला कोणतीही राजकीय चूक आढळणार नाही. सनीने यात उत्कृष्ट काम केलं आहे. विशेषतः माझ्यासोबतच्या दृश्यांमध्ये जी भावनिक होती, मला खरोखरच असं वाटलं की त्याला या वृद्ध महिलेची मनापासून काळजी आहे. हे निराशाजनक आहे, तरीही विरोधाभासीही आहे. मग लोक याचं कौतुक का करत आहेत?”, असं देखील शबाना आझमी म्हणल्या.