अफगाणिस्तान संकटात ‘रॅम्बो III’ चित्रपटाचा हा सीन व्हायरल, नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 23, 2021 | 12:33 PM

संपूर्ण देशात अराजकता माजल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून स्पष्ट पाहायला मिळतंय. दरम्यान, अतिशय प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट रॅम्बो 3 मधील एका दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तान संकटात रॅम्बो III चित्रपटाचा हा सीन व्हायरल, नेमकं कारण काय?
Follow us on

नवी दिल्लीः तालिबानने अफगाणिस्तान देश ताब्यात घेतल्याची जगभरात चर्चा आहे. अफगाणिस्तानमध्ये आता हजारो लोकांचे जीवन धोक्यात आहे. तेथील असंख्य नागरिक पासपोर्टशिवाय विमानतळावर पोहोचत असून, मिळेल त्या विमानाने देश सोडून देण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण देशात अराजकता माजल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून स्पष्ट पाहायला मिळतंय. दरम्यान, अतिशय प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट रॅम्बो 3 मधील एका दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

त्यावेळी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता

रॅम्बो III हा त्या काळातील एक सुपरहिट चित्रपट होता. त्यावेळी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. विशेष म्हणजे अफगाणिस्तानात गोंधळाची स्थिती असताना या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओ खूप शेअर केला जातोय. रॅम्बो 3 हा चित्रपट अफगाणिस्तानच्या मुजाहिदीन फायटर्सवर बनवण्यात आलाय.

रॅम्बो 3 सीन व्हायरल

1988 मध्ये सिल्वेस्टर स्टॅलोनचा ‘रॅम्बो -3’ (Rambo III) चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अॅक्शन चित्रपट असल्यानं तो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. चित्रपटाचा हिरो जॉन रॅम्बो अफगाणिस्तान-सोव्हिएत युद्धादरम्यान आपला मित्र आणि कमांडर कर्नल सॅम ट्रॉटमनला वाचवण्यासाठी अफगाणिस्तानला जातो, हे चित्रपटात दाखवण्यात आले.

अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्ध

जेव्हा तो आपल्या मित्राला घ्यायला जातो, त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्याच वेळी अमेरिकेने शत्रू सोव्हिएत युनियनविरुद्ध लढणाऱ्या अफगाण मुजाहिदीनला आपला हिरो म्हणून दाखवलेय. हा सीन चित्रपटात प्रेक्षकांना खूप आवडला. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर चाहत्यांना हा चित्रपट आठवतोय.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कर्नल ट्रॉटमन (रिचर्ड क्रेना) आणि झायसेन (मार्क डी जोंग) झायसेन यांच्यात गंभीर स्थितीत चर्चा सुरू आहे. ट्रॉटमनची अफगाणिस्तानात कशी चौकशी केली जाते हेसुद्धा व्हिडीओत पाहायला मिळतंय. स्वातंत्र्याच्या नावाखाली मध्य पूर्वेत युद्ध सुरू करणे ही मूर्खपणाची गोष्ट आहे, असा इशाराही या चर्चेत ट्रॉटमनने झीसेनला दिल्याचं दाखवण्यात आलंय.

संबंधित बातम्या

Bell Bottom BO Collection Day 4 : अक्षय कुमारच्या चित्रपटाला रक्षा बंधनचा फायदा!, चौथ्या दिवशी तब्बल इतक्या कोटींची कमाई!

Kaun Banega Crorepati 13 : देविंयो और सज्जनो, आजपासून केबीसी प्रेक्षकांच्या भेटीला, कोणते बदल, कुठे, कसा पहाणार?

What is the reason behind this viral scene of ‘Rambo III’ in Afghanistan crisis?