दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित झाले, पण कधीच…, नात्यावर अलका याज्ञीक यांचं मोठं वक्तव्य

Alka Yagnik on Personal Life: पती परदेशात, तर अलका याज्ञीक भारतात, चार - पाच वर्ष राहायचे वेगळे, यावर गायिका म्हणाल्या, 'दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित झाले, पण कधीच...', अलका फार कमी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात

दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित झाले, पण कधीच..., नात्यावर अलका याज्ञीक यांचं मोठं वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Mar 17, 2025 | 1:02 PM

गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लग्नाला 20 – 25 वर्ष होण्याआधीक अनेक जण घटस्फोटाचा निर्णय घेतात. पण बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका अलका याज्ञीक आणि त्याचे पती यांनी अनेक चांगल्या वाईट परिस्थितीचा सामना केला. पण कधीच विभक्त होण्याचा निर्णय घेतला नाही. अलका याज्ञिक यांचं लग्न 1989 मध्ये उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी झालं.

लग्नानंतर देखील दोघांना एक -दोन नाही तर तब्बल 27 वर्षे एकमेकांपासून दूर रहावं लागलं. ज्यामागे कारण देखील फार मोठं आहे. अलका आणि नीरज यांना पती – पत्नीच्या नात्यात होणाऱ्या वादांमुळे नाहीतर, करियरमुळे अनेक वर्ष एकमेकांपासून दूर व्हावं लागलं.

अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. तर अलका यांचं संपूर्ण करियर फक्त मुंबईत होतं. त्यांमुळे त्यांना मुंबईत रहावं लागायचं. अशात अलका यांच्या पतीने मुंबईत देखील व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे गायिकेने पतीला पुन्हा परदेशात व्यवसायासाठी जाण्यास सांगितलं.

 

 

यावर एका मुलाखतीत अलका यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चार – पाच वर्ष अलका आणि त्यांच्या पतीची भेट होत नसायची. अशात अलका यांनी स्वतः कबूल केलं की, पतीपासून दूर राहून त्या अन्य पुरुषांकडे आकर्षित झाल्या. पण त्या स्वतःच्या मर्यादा कधीच विसल्या नाहीत.

मुलाखतीत अलका याज्ञीक म्हणाल्या होत्या, ‘मी असं म्हणणार नाही क, मला कधीच लोकांचं आकर्षण वाटलं नाही. पण मी कधीच चुकली नाही कारण मला माझी मूल्या माहिती होती…’, अलका फार कमी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

‘रब करे’, ‘ओढणी’, ‘उडजा काले कावान’, ‘साजन साजन तेरी दुल्हन’, ‘कितना प्यारा तुझे…’ यांसारखी असंख्य गाणी गायिका अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांनी गायली आहेत. आज देखील त्यांची गाणी कोणत्याही महत्त्वाची क्षणी वाजतात. अलका याज्ञिक कायम त्यांच्या गोड आवाजामुळे आणि एकापेक्षा एक गाण्यांमुळे चर्चेत राहिल्या…