नीतू कपूर यांच्या लेकीला सासरी ‘ही’ गोष्ट करण्यास सक्त मनाई, लग्नाला झालीत 19 वर्ष तरीही…
Neetu Kapoor Daughter: नीतू कपूर यांच्या लेकीला सासरी 'ही' गोष्ट करण्यास सक्त मनाई, नीतू कपूर यांचे जावई पत्नीला किचनमध्ये देखील जावू देत नाहीत, कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण

Neetu Kapoor Daughter: कपूर कुटुंब हे बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे. त्यामुळे कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. कपूर कुटुंबातील लेक करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अभिनेत्री नीतू कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रिद्धीमा कपूर हिने बॉलिवूमध्ये पदार्पण केलं नाही. पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. रिद्धीमा हिच्या लग्नाला जवळपास 19वर्ष झाली आहेत. पण रिद्धीमा हिला सासरी किचनमध्ये जाण्यात सक्त मनाई आहे. मुलाखतीत यावर रिद्धीमाने मोठा खुलासा केला होता.
एका मुलाखतीत, रिद्धिमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. लॉकडाऊन दरम्यान रिद्धिमा गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहायची. लग्नाआधी स्वयंपाक शिकून घे… असा सल्ला रिद्धिमला आई नीतू कपूर यांनी दिला होता. पण लग्नानंतर भरत याने पत्नीला किचनमध्ये काम करण्यास सक्त मनाई केली.
View this post on Instagram
रिद्धिमाला विचारलं, ‘गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहिल्यानंतर तू कोणती रेसीपी बनवली? यावर नकार देत रिद्धिमा म्हणाली, ‘मी माझे पती आणि लेकीसाठी पास्ता बनवते आणि दोघांना मी बनवलेला पास्ता प्रचंड आवडतो. जेव्हा मी लग्न करणार होती, तेव्हा आई मला कायम स्वयंपाक शिकून घे असं सांगायची. कारण मी पंजाबी कुटुंबात जाणार होती… तिकडे सर्वांना नवीन पदार्थ आवडत होते….’
पुढे रिद्धिमा म्हणाली, ‘लग्नानंतर विविध प्रकारचे पदार्थ बनवायची. ज्यामुळे माझ्या पतीचं वजन 90 किलो झालं होतं. भरतचं सतत वजन वाढत असल्यामुळे मी स्वयंपाक करणं बंद केलं…. मझ्या मुलीला आणि पतीला मी बनवलेले पदार्थ आवडतात.’
रिद्धिमा आणि भरत यांच्या मुलीचं नाव समारा साहनी आहे. समारा हिचा जन्म 2011 साली झाला होता. रिद्धिमा सहानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
