
नवी दिल्ली : जेव्हा जेव्हा बॉलीवूडमधील (bollywood) मोठ्या कुटुंबांचा विषय निघतो तेव्हा बच्चन कुटुंबाचा उल्लेख न होणं अशक्य आहे. सिनेइंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित आणि सन्मानित कुटुंब अशी त्यांची ओळख आहे. कौटुंबिक मूल्यांचा विषय निघतो तेव्हा बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाचा उल्लेख हटकून केला जातो. अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) , अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek Bachchan) आणि सूनबाई ऐश्वर्या राय बच्चन अशा नामाकिंत अभिनेत्यांचे कुटुंब हे नेहमीच चर्चेत असते. अभिषेकशी लग्न झाल्यावर ऐश्वर्या राय ही देखील शिस्तबद्ध बच्चन कुटुंबाचा एक भाग बनली. 2007 सालापासून ती नेहमी आदर्श सूनेच्या स्वरूपात दिसते.
मात्र तिचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत असून त्यात तिच्या वागणुकीमुळे अमिताभ बच्चन हे नाराज असल्याचे दिसत आहे. मीडियासमोर ऐश्वर्याने असं काही केलं ज्यामुळे बिग बीं वर कठीण परिस्थिती ओढावलेली दिसली.
नेमक काय झालं ?
खरंतर या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिताभ बच्चन एका कार्यक्रमात आलेले दिसतात आहेत. ऐश्वर्या मीडियाशी बोलत असतानाच अमिताभ यांचे तिथे आगमन होते आणि त्यांना पाहून ऐश्वर्या त्यांना अलिंगन देण्यास पुढे जाते. ‘ही इज बेस्ट.. बेस्ट’ (he is best best..) असे म्हणत ती त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली. मात्र ऐश्वर्याचे ही वागणूक अमिताभ यांना आवडल्याचे दिसत नाही आणि ते तिला सर्वांसमोरच सुनावतात.
सुनेला दिले शिस्तीचे धडे
ऐश्वर्याच्या वागणुकीमुळे थोडे अस्वस्थ झालेल्या बिग बींनी तिला सर्वांसमोरच फटकारत शिस्तीचे धडे दिले. ‘ आराध्यासारखं (लहान मुलीप्रमाणे) वागणं बंद कर ‘ अस बिग बी यांनी तिला सुनावलं जे ऐकून ऐश्वर्याची आश्चर्यचकित झाली. सर्वांसमोरच सासऱ्यांनी सूनबाईल शिस्त शिकवल्याचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.