माझ्या नवऱ्याने काय चुकीचं केलं, कोणत्याही पुरुषाने… धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या लग्नावर पहिली बायको बोलली तेव्हा…

Prakash Kaur on Dharmendra Second Marriage: कोणताही पुरुष असता तर त्याने माझ्या जागी हेमा यांची..., धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटला, तेव्हा काय म्हणाल्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर?

माझ्या नवऱ्याने काय चुकीचं  केलं, कोणत्याही पुरुषाने... धर्मेंद्र - हेमा मालिनी यांच्या लग्नावर पहिली बायको बोलली तेव्हा...
फाईल फोटो
| Updated on: Aug 30, 2025 | 10:18 AM

Prakash Kaur on Dharmendra Second Marriage: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये बॉलिवूडच्या ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. कारण हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याआधी धर्मेंद्र यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना चार मुलं देखील होती. अशा परिस्थितीच धर्मेंद्र यांनी समाजाच्या विरोधात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर धर्मेंद्र यांच्यावर अनेकांनी टीका केली. पण या कठीण परिस्थितीत एका व्यक्तीने धर्मेंद्र याची साथ सोडली नाही. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर होत्या… ऐकायला – वाचायला थोडं विचित्र आहे, पण हेच सत्य आहे…

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर लाईमटाईट पासून दूर असतात. धर्मेंद्र यांच्या आयुष्यात हेमा मालिनी यांची एन्ट्री झाल्यानंतर प्रकाश कौर यांच्या आयुष्यात दुखःचा डोंगर कोसळला… पण प्रकाश कौर यांनी कायम पतीव्रता असल्याचा धर्म पाळला. त्यांनी कधीच पतीची साथ सोडली नाही.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर प्रकाश कौर यांनी पतीच्या दुसऱ्या लग्नावर मौन सोडलं होतं. एका मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, ‘कोणत्याही पुरुषाने माझ्या जागी हेमा यांची निवड केली असती. यामध्ये माझ्या नवऱ्याने चुकीचं काय केलं. आर्धी इंडस्ट्री हेच करत आहे… सर्व अभिनेते अफेअर करत आहेत, दुसरं लग्न करत आहे… ते (धर्मेंद्र) चांगले पती नसले तरी ते चांगले पिता आहे… त्यांचं मुलांवर प्रचंड प्रेम आहे… त्यांनी कधीच मुलांकडे दुर्लक्ष केलं नाही…’ असं प्रकाश कौर म्हणाल्या होत्या.

प्रकाश कौर यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल देखील मत व्यक्त केलं होतं. ‘मी हेमा यांना समजू शकते… त्यांनी किती कठीण परिस्थितीचा सामना केला असेल हे देखील मी समजू शकते… जर मी हेमा यांच्या जागी असती, तर मी असं कधीच करु शकली नसती. एक महिला असल्याच्या नात्याने मी भावना समजू शकते. पण पत्नी आणि आई असल्यामुळे मी हेमा बरोबर आहेत असं कधीच म्हणू शकत नाही…’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या होत्या…

धर्मेंद्र यांचे दोन लग्न आणि 6 मुलं…

धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्यासोबत पहिलं लग्न केलं. पहिल्या लग्नानंतर त्यांनी दोन मुलं सनी देओल, बॉबी देओल आणि दोन मुलींचं जगात स्वागत केलं. त्यानंतर 1980 मध्ये प्रकाश कौर यांनी घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना देखील दोन मुली आहे. त्यांच्या मुलींचं नालन ईशा देओल आणि अहाना देओल असं आहे.