Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला….
Maratha Reservation Protest: आंदोलक सणासुदीच्या काळात... जरांगे पटील यांचा फोटो शेअर करत रितेश देशमुखची लक्षवेधी पोस्ट, सध्या सर्वत्र रितेश देशमुख याच्या पोस्टची चर्चा सर्वत्र सुरु आहे...

Maratha Reservation Protest: आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही… अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फक्त मराठी बांधवांनीच नाही तर, त्यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. आज बऱ्याच आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. तर अभिनेता रितेश देशमुख याने देखील मनोज जरांगे पाटील यांचा एत फोटो पोस्ट करत स्वतःचं मत व्यक्त केलं आहे.
रितेश याने मनोज जरांगे पाटील यांचा एक फोटो आणि मराठा बांधवानी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ जी गर्दी केली होती त्याचा एक फोटो शेअर केला. अभिनेता पोस्टमध्ये म्हणाला, ‘सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.’ सध्या अभिनेत्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025
रितेश याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहे. तर अनेकांना आंदोलनामध्ये जाऊन सहभागी व्हावे.. असा सल्ला देखील अभिनेत्याला दिला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दादा.. खुद्द तिथ जाऊन आंदोलनाला भेट द्या आणि पाठिंबा जाहीर करा… आ. स्वर्गीय. देशमुख साहेबांना हीच श्रद्धांजली असेल.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘न्याय मिळणार हे तर शिंदे आणि फडणवीस पण बोलत आहेत. काय नवीन लिहिलं तुम्ही ? रितेश भाऊ, फक्त ट्विट करून मोकळे झाले…’ या प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
