धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिली पत्नी प्रकाश कौर कोणासोबत राहणार?

हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं असलं तरी धर्मेंद्र हे पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबतच राहत होते. खंडाळ्यातील फार्महाऊसवर दोघं एकत्र राहायचे. खुद्द बॉबी देओलने याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिली पत्नी प्रकाश कौर कोणासोबत राहणार?
धर्मेंद्र, प्रकाश कौर
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2025 | 3:22 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर पूर्णपणे खचल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्या एकट्या पडद्या आहेत. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर हे गेल्या 71 वर्षांपासून एकत्र होते. 1954 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र हे प्रकाश कौर यांच्यासोबतच राहत होते. खुद्द हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की त्या धर्मेंद्र यांच्यासोबत राहत नव्हत्या. धर्मेद्र आणि प्रकाश कौर एकत्र राहत असल्याची गोष्ट त्यांचा मुलगा बॉबी देओलनेही सांगितली होती.

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान बॉबी देओलने धर्मेंद्र फार्महाऊसमध्ये का राहत होते, याविषयी सांगितल. “लोकांना वाटतं की बाबा फार्महाऊसमध्ये एकटे राहतात. पण ते खरं नाही. माझी आई त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये राहते. ते खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये एकत्र राहतात. त्यांना तिथे राहणं आवडतं. त्यांच्या वयोमानानुसार त्यांना तिथेच राहायला आवडतंय. तिथलं जेवण आणि हवामान त्यांच्या प्रकृतीसाठी अनुकूल आहे”, असं बॉबीने स्पष्ट केलं होतं.

प्रकाश कौर आता कोणासोबत राहणार?

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आता प्रकाश कौर मोठा मुलगा सनी देओलसोबत राहणार असल्याचं कळतंय. सनीचा मुंबईतील जुहू परिसरात बंगला आहे. या बंगल्यात तो त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत राहतो. आता प्रकाश कौरसुद्धा त्याच्यासोबत याच बंगल्यात राहतील, असं समजतंय.

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु नंतर ते उपचारांना हळूहळू प्रतिसाद देऊ लागले होते. अखेर देओल कुटुंबीयांना त्यांना घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us