शाहरुख खानचा धाकटा लेक अब्रामची खरी आई कोण आहे माहितीये?

शाहरुख खानचा मुलगा अब्राम खानच्या बाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. कोण म्हणत तो दत्तक आहे तर कोण म्हणतं सरोगसीद्वारे जन्माला आलेलं बाळ. अब्रामची आई नक्की कोण आहे?

शाहरुख खानचा धाकटा लेक अब्रामची खरी आई कोण आहे माहितीये?
AbRam Khan
Image Credit source: instagram
| Updated on: May 26, 2025 | 5:00 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या प्रेमळ स्वभावाबद्दलही ओळखला जातो. तो त्याच्या चाहत्यांनाही तेवढंच प्रेम देतो. शिवाय शाहरूख आपल्या कुटुंबावर किती प्रेम करतो हे सर्वांना माहितच आहे.विशेष करून शाहरूखचा त्याच्या धाकटा लेक अब्रामवर किती जीव आहे हे सर्वांनीच वेळोवेळी पाहिलाही मिळालं आहे. शाहरुखने अनेकदा सांगितले आहे की जेव्हा तो घरी असतो तेव्हा त्याचे एकमेव काम म्हणजे अबरामसोबत खेळणे आणि वेळ घालवणे.

शाहरुखचा लेक अब्रामवर फार जीव

शाहरुखला त्याचा मोठा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानावर सारखेच प्रेम आहे. पण अब्राम कुटुंबात सर्वात लहान आहे, म्हणून संपूर्ण कुटुंब त्याला जास्त प्रेम करतं. केकेआरचे सामने पाहण्यासाठी अब्राम अनेक वेळा स्टेडियममध्ये उपस्थित राहिला आहे. तो नेहमीच त्याच्या वडिलांसोबत मस्ती करतानाही दिसतो. शाहरुख नेहमीच अब्रामवर खूप प्रेम करताना दिसला आहे.

अब्राम सरोगसीद्वारे जन्मलेलं बाळ

अनेकांना हे माहित नाही की शाहरुखचा धाकटा मुलगा अब्राम हा शाहरूख आणि गौरीचा सरोगसीद्वारे जन्मलेलं बाळ आहे. त्यामुळे अनेकदा चाहत्यांनाही हा प्रश्न पडतो की, अब्रामची आई नक्की कोण आहे?

अब्रामची खरी आई कोण?

अब्रामचा जन्म सरोगसीद्वारे झाला. या सरोगसीद्वारे जन्मलेल्या बाळाच्या आईची ओळख उघड करता येत नाही. हे कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे. पण अब्रामची आई कोण आहे याबद्दल अनेक अफवा आहेत. बरेच लोक वेगवेगळे दावे करतात.अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जातो की अब्रामची आई या देशातील नाही. ती दुसऱ्या देशाची आहे. पण शाहरुख किंवा गौरी दोघांनीही याबद्दल कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


अब्रामच्या आईबद्दल या अफवा आणि अनुमान 

बरेच लोक म्हणतात की अब्राम हा शाहरुख खानच्या मेव्हणीचा मुलगा आहे, जिला त्याने दत्तक घेतले आहे. अब्रामच्या जन्मापूर्वी या जोडप्याने कधीही याचा उल्लेख केला नव्हता. तथापि, लोकांच्या बोलण्यावर आणि किंवा येत असलेल्या वेगवेगळ्या अनुमानांवर विश्वास नक्कीच ठेवता येणार नाही.अब्रामची आई कोण आहे याबद्दल प्रश्न नक्कीच उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जोपर्यंत शाहरूख खान किंवा गौरी याबद्दल काही प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत या अशा अफवा उठणारच आहेत.