Man Dhavtay Tujhyach Mage song: ‘मन धावतंय तुझ्याच मागं’ गाणे गाणारी गायिका राधिका भिडे आहे तरी कोण? रातोरात बदललं आयुष्य

Man Dhavtay Tujhyach Mage song: सध्या अनेकांच्या स्टेटसला किंवा फोटोंना फक्त एकच गाणं ऐकू येतय ते म्हणजे 'मन धावतंय तुझ्याच मागे.' आता हे गाणे नेमकं कोणी गायलं आहे? ती गायिका कोण आहे? सध्या काय करते? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. चला जाणून घेऊया...

Man Dhavtay Tujhyach Mage song: मन धावतंय तुझ्याच मागं गाणे गाणारी गायिका राधिका भिडे आहे तरी कोण? रातोरात बदललं आयुष्य
Radhika Bhide
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Nov 18, 2025 | 3:51 PM

सोशल मीडियावर सध्या एक गाणं ट्रेंड होताना दिसत आहे ते म्हणजे मन धावतंय तुझ्याच मागे.’ सध्या अनेकांच्या स्टेटसला, सोशल मीडियावरील फोटोंना हे केवळ हे एकच गाणं ऐकायला मिळत आहे. या गाण्याने अनेकांच्या मनावर जादू केली आहे. आता हे गाणं गाणारी गायिका कोण आहे? ती सध्या काय करते? तिचे आगामी प्रोजेक्ट कोणते असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे. एका रात्रीत स्टार झालेल्या गायिकेविषयी चला जाणून घेऊया…

मन धावतंय तुझ्याच मागं’ हे गाणे राधिका भिडेने गायले आहे. राधिका ही कोकणातील आहे. तिच्या आवाजाने अक्षरश: संपूर्ण देशाला वेड लावले आहे. तिच्या निरागस आवाजतील जादूने तरुण तर घायाळ झाले आहेत. राधिकाचं मन धावतंय तुझ्याच मागं’ या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार झाली. तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. तिला अनेक नव्या गाण्यांची ऑफर येत असल्याचे दिसत आहे.

कोण आहे राधिका भिडे?

राधिका भिडे ही कोकणातील रत्नागिरी जिल्हातील आहे. तिची बहिण शमिका भिडे ही देखील प्रसिद्ध गायिका आहे. राधिका सध्या एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आयपॉपस्टार या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात तिने मन धावतंय तुझ्याच मागं’ हे गाणे गायले. या गाण्याने कार्यक्रमातील परिक्षकांच्या देखील मनाला स्पर्श केला. तसेच हे गाणे गातानाचा राधिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार बनली. राधिकाने हे गाणे गाताना मराठमोळा लूक केला आहे. तिने नऊवारी साडी नेसली होती. तसेच कपाळाला चंद्रकोर, सिंपल लूकमध्ये राधिका अतिशय क्यूट दिसत आहे. ती सध्या तरुणांची क्रश बनली आहे.

राधिकाच्या आगामी प्रोजेक्टविषयी

एका गाण्यामुळे रातोरात स्टार झालेल्या राधिकाला सध्या अनेक ऑफर्स येत आहेत. ती लवकरच उत्तर या मराठी सिनेमात ‘हो आई’ हे गाणे गाणार आहे. राधिकाचे पार्श्वगायिका म्हणून हे पहिलेच गाणे असणार आहे. उत्तर या मराठी सिनेमाच्या प्रमोशनल गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि ‘तू आहेस म्हणून मी आहे’ ही भावना सोप्या शब्दात उलगडली आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधिकाच्या या पहिल्या प्रोजेक्टविषयी सर्वांमध्ये आतुरता पाहायला मिळतेय.