AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होती कुमुद राणे? जिच्या निधनाने शोकसागरात बुडालं सलमान खानचं कुटुंब, भाईजानचेही डोळे पाणावले

सोशल मीडियावर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सलमानसह त्याचा भाऊ सोहैल खान, सोहैलचा मुलगा निर्वाण खान, अरबाजचा मुलगा अरहान हे सर्वजण भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

कोण होती कुमुद राणे? जिच्या निधनाने शोकसागरात बुडालं सलमान खानचं कुटुंब, भाईजानचेही डोळे पाणावले
Kumod Rane and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 11:51 AM
Share

अभिनेता सलमान खानची ‘फॅमिली फ्रेंड’ कुमुद राणेचं मंगळवारी 9 जून रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. कुमुदला अंतिम निरोप देण्यासाठी सलमान आणि त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सलमानचे डोळे पाणावले होते. सलमानसोबत बहीण अर्पिता आणि भाऊ सोहैल खान, अरबाज खान, त्यांची मुलं, आई सलमा आणि हेलन हे सर्वजण भावूक झाल्याचं पहायला मिळालं. सलमान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत कुमुदचं खूप जवळचं नातं होतं.

कोण होती कुमुद राणे?

ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, कुमोद राणे एक एंटरप्रेन्योर आणि दुबईतल्या ‘रेन ब्युटी बार’ची संस्थापक होती. ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीतील योगदानासाठी तिचा बऱ्याचदा सन्मान करण्यात आला होता. तिची सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत खूप चांगली मैत्री होती. कुमुदचं गेल्या अनेक वर्षांपासून खान कुटुंबीयांसोबत जवळचं नातं होतं. म्हणूनच कुमुद यांच्या अंत्यविधीला सलमान खानसोबत त्याची आई सलमा खान, हेलन, सोहैल खान, निर्वाण खान, अरहान खान आणि अर्पिता खान शर्मा हे सर्वजण उपस्थित होते.

सोहैल खानची पोस्ट-

सोहैल खानने कुमुदसाठी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘आज मी माझ्या लाडक्या बहिणीला गमावल आहे. या जगात तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. कुमुद राणे ही कबीर आणि कुगीसाठी लाइफलाइन होती. अशी वेळ खूप अन्यायकारक वाटू लागते. अशा वेळी देवावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागतो. मी प्रार्थना करतो की ती जिथे कुठे असेल, तिथे आनंदी राहू दे. ती कायम आमच्या आठवणीत राहील’, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

सलमान खान भावूक

सलमानची बहीण अर्पिता खाननेही कुमुदचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘प्रिय कुमुद, आपण एकत्र घालवलेले क्षण आम्ही नेहमीच लक्षात ठेवू. आम्हाला तुझा स्नेह, तुझं प्रेम आणि तुझे विनोद यांची खूप आठवण येईल. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला माहीत आहे की तू नेहमीच आमच्यावर लक्ष ठेवशील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’ सलमानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरनेही कुमुद राणेसोबतचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली अर्पण केली.

केवळ खान कुटुंबच नाही, तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कुमुदच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कुमुदच्या इन्स्टाग्रामवर सलमान खान, मलायका अरोरा, बॉबी देओल यांच्यासह इतर सेलिब्रिटींचेही फोटो पहायला मिळतात. यावरून तिचं इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसोबत जवळचं नातं असल्याचं स्पष्ट होतंय. ज्येष्ठ अभिनेत्री बिना काक यांनीसुद्धा कुमुद राणेसोबतचा फोटो शेअर करून तिला श्रद्धांजली वाहिली.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच