50 वर्षांपूर्वीचं गाणं अचानक ट्रेंडमध्ये, इतकं हिट की बनले करोडो रील्स, पण कोणालाच माहिती नाही कोणी लिहिलं?

50 वर्षांपूर्वीचं गाणं, जे अचानक सोशल मीडियावर पुन्हा मोठ्या प्रमाणात होऊ लागलं व्हायरल. पण गाणं कोणी लिहिलं आणि त्याचा अर्थ काय? कोणालाच माहिती नाही. तरी देखील या गाण्यावर बनत आहेत लाखो रील्स.

50 वर्षांपूर्वीचं गाणं अचानक ट्रेंडमध्ये, इतकं हिट की बनले करोडो रील्स, पण कोणालाच माहिती नाही कोणी लिहिलं?
| Updated on: Oct 05, 2026 | 5:49 PM

90 च्या दशकातील गाणी आजही अनेक प्रेक्षक प्रचंड आवडीने ऐकतात. मात्र, काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणार गाणं ज्यावर आतापर्यंत लाखो-करोडो रिल्स तयार होऊन देखील हे गाणं कोणाचं आहे हे अद्याप कोणालाच माहिती नाही.

मराठी लोककला आणि शाहिरी परंपरेला आपल्या लेखणीतून समृद्ध करणारे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या अनेक रचना आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या अशाच एका जुन्या आणि लोकप्रिय गाण्याने सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. ‘माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का…’ या गाण्याच्या रील्स सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loading...

सुमारे 50 वर्षांपूर्वी लिहिलेलं हे गाणं आजच्या पिढीलाही आपलंसं वाटत आहे. बालशाहीर हर्षराज माळी आणि इतर शाहिरांनी या गाण्याचं नव्या अंदाजात सादरीकरण केल्यानंतर जुन्या गाण्याला सोशल मीडियावर नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक जण या गाण्यावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत असून त्यामुळे हे गाणं पुन्हा एकदा लोकांच्या ओठांवर आलं आहे.

सामान्य माणसाच्या स्वप्नांची गोष्ट

‘माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का…’ या ओळी केवळ एका गाडीबद्दल नाहीत तर त्या काळातील सामान्य माणसाच्या इच्छा-आकांक्षा व्यक्त करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही चांगलं आयुष्य जगावं, श्रीमंतीची स्वप्नं पाहावीत आणि एखाद्या दिवशी स्वतःची गाडी असावी अशी इच्छा या गाण्यातून व्यक्त होते.

फियाट ही त्या काळात सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा विषय असलेली गाडी होती. त्यामुळे गाडी पाहताना ‘ही माझी असती तर?’ अशी मनात निर्माण होणारी भावना वामनदादांनी आपल्या खास शाहिरी शैलीत मांडली. साध्या शब्दांमधून सामान्य माणसाच्या मनातील मोठं स्वप्न आणि त्यामागची हुरहूर त्यांनी या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त केली.

जुन्या गीताला नव्या पिढीची पसंती

काळ बदलला, गाड्यांचे प्रकार बदलले आणि सोशल मीडियामुळे मनोरंजनाची माध्यमंही बदलली. मात्र, वामनदादांच्या या गाण्यातील भावना आजही तितक्याच जिवंत आहेत. बालशाहीर हर्षराज माळी आणि इतर शाहिरांच्या नव्या सादरीकरणामुळे हे गाणं तरुण पिढीपर्यंत पोहोचलं आहे.

इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून एखाद्या जुन्या गाण्याला पुन्हा लोकप्रियता मिळण्याचं हे आणखी एक उदाहरण ठरलं आहे. पाच दशकांपूर्वी सामान्य माणसाच्या स्वप्नांना आवाज देणारं ‘माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का…’ हे गाणं आजच्या डिजिटल युगातही प्रेक्षकांना भावत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us