Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला नकार दिला यात माझं नुकसान पण.. अनिल कपूर यांच्या उत्तरातून खूप काही शिकण्यासारखं

Dhurandhar 2 : बॉलिवूडमध्ये जेव्हा एखादा सिनेमा हिट ठरतो, त्यावेळी काही कलाकारांना त्याचा भाग बनण्याची संधी असते. पण कलाकार नकार देतात. सध्या सर्वत्र गाजत असलेल्या धुरंधर 2 चित्रपटाच्या बाबतही अनिल कपूर यांनी हेच केलं. त्यांनी का नकार दिला? त्या मागची काय कारणं आहेत?.

Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला नकार दिला यात माझं नुकसान पण.. अनिल कपूर यांच्या उत्तरातून खूप काही शिकण्यासारखं
Anil Kapoor
| Updated on: Mar 20, 2026 | 2:56 PM

सध्या सगळीकडे धुरंधर 2 चित्रपटाची चर्चा आहे. पहिल्या दोन दिवसातच या चित्रपटाने जगभरात 200 कोटीची कमाई केली आहे. तेच भारतात या चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. पुढच्या काही दिवसात धुरंधर 2 भारतीय सिनेमात कमाईचा नवीन इतिहास घडवेल ही शक्यता नाकारता येत नाही. हा चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडणारा प्रत्येक जण या चित्रपटाचं कौतुक करतोय. कारण धुरंधरचा पहिला पार्ट ज्या वळणावर संपलेला तिथे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. त्याची उत्तर दुसऱ्या भागात आहेत. एका उत्तम कलाकृती पाहिल्याचा प्रेक्षकांचा अनुभव आहे. धुरंधरमध्ये हमजा अली मझारीचं पात्र साकारणारा रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे.

पण या चित्रपटातील अन्य कलाकार, त्यांचे सीन्स सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. कारण या चित्रपटाची मेकिंगच तशी आहे. दिग्दर्शकाला न दिसलेल्या गोष्टी प्रेक्षक लक्षात आणून देतायत. इतकी या चित्रपटाची क्रेझ आहे. धुरंधरचा पहिला भाग हिट ठरल्यानंतर काही कलाकारांची नावं समोर आली होती, ज्यांनी या चित्रपटाला नकार दिलेला. आता दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतरही अशाच एका मोठ्या कलाकाराचं नाव समोर आलय. अनिल कपूर. त्यांनी धुरंधर 2 ला नकार दिला. एका कार्यक्रमात त्यांनी यावर खुलासा केला. नकार देण्यामागचं कारण त्यांनी जे सांगितलं, ते जे बोलले ते विचार करायला भाग पाडण्यासारखं आहे.

Loading...

अनिल कपूर यांनी का नकार दिला?

“धुरंधर 2 मध्ये एका छोट्या केमियोसाठी आदित्य धरने माझ्याशी संपर्क साधला होता. पण मी नकार दिला. मी आज जो काही आहे ते माझं प्रोफेशनलिझम आणि कटिबद्धता दिलेला शब्द पाळणं यामुळे आहे. ते जास्त महत्वाचं आहे. टॅलेंटमुळे सर्व काही होत नाही. मी आदित्यला बोललो की, मला खरचं हा रोल करायला आवडला असता. पण मी हे दिवस दुसऱ्या कोणाला तरी दिले आहेत” असं अनिल कपूर म्हणाले.

“आता हा चित्रपट रिलीज होतोय. उत्तम चित्रपट आहे. यात माझं नुकसान आहे. पण हरकत नाही. मी असाही विचार केला की, मी आदित्यचा चित्रपट करतोय आणि त्याचवेळी एखाद्या दुसऱ्या ब्लॉक बस्टर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला बोलावलं आणि आदित्यचा चित्रपट नाकारुन त्यावेळी मी त्याची फिल्म केली तर ते अनप्रोफेशनलिझम ठरेल. त्यामुळे भविष्यात आम्ही काम करु” असं अनिल कपूर म्हणाले. धुरंधर 3 का? ‘मला वाटत काहीतरी नवीन करु’ असं उत्तर अनिल कपूर यांनी दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us