बॅचलरना मुंबईत घर का नाही ? मराठी लोकांनी नालासोपारातच रहायचे का ? मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल

आपण मराठी आणि महाराष्ट्रीयन असून आपल्याला केवळ बॅचलर असल्याने अंधेरीत लोखंडवाला येथे राहायला भाड्याने घर मिळत नाही. मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरारोड येथेच राहायचे का असा सवाल मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हीने केला आहे.

बॅचलरना मुंबईत घर का नाही ? मराठी लोकांनी नालासोपारातच रहायचे का ? मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
sarika salunkhe
| Updated on: Aug 10, 2026 | 11:57 PM

बॅचरल लोकांना भाड्याने घर मिळत का नाही ? आम्हालाही आमच्या फॅमिलीला घेऊन सोबत राहायचे असते. मग गावी आमची शेती करणार कोण ? मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरारोडमध्येच राहायचे का असा सवाल मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हीने एका पोस्टद्वारे केला आहे. सारिका साळुंखे हीने अंधेरी लोखंडवाला येथे बॅचरल लोकांना भाड्याने घर मिळत नसल्याची समस्या मांडली आहे. बॅचरल लोकांना घर भाड्याने देऊ नये हा नियम बदलण्यात यावा आणि घराच्या भाड्याएवढीच दलाली हा नियम देखील बदलावा अशी मागणी सारिका साळुंखे हीने केली आहे.

सारिका साळुंखे हीने आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये, आम्हाला ही फॅमिली सोबत राहायला आवडेल, मात्र, आम्ही मराठी कलाकार बॅचरल म्हणून आम्हाला घर नाकारले जाते. अंधेरी लोखंडवाला येथे घराचे भाडे पन्नास हजार आणि दलाली देखील ५० हजार आहे. का कुठला कायदा असा सवाल सारिका हिने केला आहे. माझे आई-वडील सातारा येथे राहातात.आम्ही आनंदासाठी एकटे राहत नाही. त्यांना घेऊन आम्ही येथे राहु शकत नाही.ते गावी शेती करतात. आमची शेती मग तुम्ही जाऊन करणार का ? मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरारोडमध्ये राहायचे का असाही सवाल सारिका साळुंखे हीने केला आहे.

सारिका साळुंखे ही होतकरु अभिनेत्री मूळची महाराष्ट्रातील सातारा येथील आहे. स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत तिने साकारलेल्या ‘निरी’ या भूमिकेमुळे ती महाराष्ट्रात घरोघरी प्रसिद्ध झाली.सारिका हीने नुकत्याच रिलीज झालेल्या पेद्दी चित्रपटातही छोटी भूमिका केली आहे. गावाकडून आलेल्या बॅचलर्सना मुंबईत घर भाड्याने मिळत नसल्याने तिने आपला संताप व्यक्त केला आहे. आम्ही काम करायला संघर्ष करुन गावाकडुन येथे आलो आहोत. तर परीवार कोठून आणणार ? असा सवाल सारिका साळुंखे हीने केला आहे.

येथे पोस्ट वाचा –

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us