AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता भाऊ कदमची मुलगी अमेरिकेला का झाली शिफ्ट, कारण आलं समोर

अभिनेता भाऊ कदमचं नाव घेतलं तरी लोकं मनात त्यांचे विनोद आठवतात. भाऊ कदम हे कामेडीच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत आले आहेत. सध्या भाऊ कदम यांची मुलगी देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती देखील एक डिजीटल क्रिएटर आहे. सध्या ती अमेरिकेला शिफ्ट झाली आहे. कारण काय जाणून घेऊयात.

अभिनेता भाऊ कदमची मुलगी अमेरिकेला का झाली शिफ्ट, कारण आलं समोर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 17, 2024 | 7:17 PM
Share

प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांनी टेलिव्हिजनवरच नाही तर मोठ्या पडद्यावरही लोकांचं मन जिंकलं आहे. भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली. भाऊ कदम यांनी सुरुवातीच्या दिवसात अनेक संघर्ष केले. बऱ्याचदा ते लोकल ट्रेनने प्रवास करताना देखील दिसायचे. भाऊ कदम यांना एक मुलगी देखील आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भाऊ कदम यांच्या मुलीचे नाव मृण्मयी कदम आहे. जी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मृण्मयी युट्यूबवर तिचे व्हिडीओ आणि डेली व्लॉग शेअर करते.

नाटकांमध्ये काम करण्याची इच्छा

मृण्मयीला नाटकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. तिला भाऊ कदम यांची मुलगी नाही तर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. मृण्मयी कदम हिने नुकतंच तिचं कॉलेज पूर्ण केलं असून ती विदेशात शिफ्ट झाली आहे. विदेशात जात असतानाचा व्हिडिओ देखील तिने शेअर केलाय. मृण्मयी आता अमेरिकेत गेली आहे. आता अनेकांना असा प्रश्न देखील पडला असेल की, ती अमेरिकेत का गेलीये. तर त्यामागचं कारण असं आहे की, तिला आता अमेरिकेत पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. असे तिने तिच्या व्लॉगमध्ये सांगितले आहे.

अमेरिकेत जाताना भावूक

मृण्मयी कदम अमेरिकेला जात असताना भावूक झाली होती. कुटुंबियांना सोडून तिला शिक्षणासाठी अमेरिकेत जात असताना अश्रृ अनावर झाले. कदम कुटुंब तिला सोडण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. अमेरिकेत ती मैत्रिणींबरोबर राहत आहे. आपल्याला घरच्या व्यक्तींची आठवण सतावत असल्याचं देखील तिने म्हटलं होतं. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी शिकण्यासाठी अमेरिकेत गेल्याने त्याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. भाऊ कदम यांच्या लाखो चाहत्यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मृण्मयी कदमने आपल्या पहिल्या पगारातून वडिलांसाठी एक खास गिफ्ट घेतलं होतं. आपल्या व्हिडिओमध्ये तिने ही गोष्ट शेअर केली होती. अभिनेते भाऊ कदम आता कलर्स मराठीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. भाऊ कदम सोबत निलेश साबळे आणि ओंकार भोजने हे देखील या कार्यक्रमाचे भाग आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...