
बॉलिवूडचा दबंग सलमान खानसमोर बरेच कलाकार आहेत जे त्याच्यासमोर बोलताना दहा वेळा विचार करतात. याचं कारण म्हणजे त्याची पर्सनॅलिटी. पण तुम्हाला ही गोष्ट जाणून धक्का बसेल की एक अभिनेत्याने चक्क सलमान खानला त्याच्या तोंडावर एक वाक्य म्हटलं होतं की, “अरे… मी तुझ्यासारख्यांना ड्रायव्हर ठेवतो” पण हा डायलॉग मारल्यानंतरही सलमान खानने त्या अभिनेत्याला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहितच केलं. नेमकं काय घडलं होतं. चला जाणून घेऊयात.
सलमान खानला थेट तोंडावर बोलला तो डायलॉग
सलमान खानला थेट तोंडावर हे वाक्य बोलणार हा अभिनेता म्हणजे सुदेश लेहरी. त्याच कारण असं की, सुदेश लेहरीने सलमान खानच्या रेडी चित्रपटातही काम केले आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांची देखील एक महत्त्वाची भूमिका होती. आणि जे पात्र त्यांनी साकारलं आहे. त्या पात्राला हा डायलॉग होता जो सलमान खानला बोलायचा होता. पण त्यावेळी सुदेश हा डायलॉग बोलायला खूप घाबरत होते. सुदेश यांनी एका मुलाखतीत स्वत: हा किस्सा सांगितला आहे.
‘मी घाबरलो. मला वाटले की कदाचित त्याला मी आवडलो नसेल’
सुदेश म्हणाले की, “रेडीच्या आधी मी बरेच पंजाबी चित्रपट केले होते. मी एक-दोन हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. पण रेडी हा माझ्यासाठी मोठ्या दर्जाचा चित्रपट होता. जेव्हा मला त्यांची ऑफर मिळाली तेव्हा माझे मुंबईत घर नव्हते. मी हॉटेलमध्ये राहायचो. एके दिवशी मला फोन आला की अनीस बझमीने तुम्हाला फोन केला आहे. मी त्यांना भेटायला गेलो. तिथे ते माझ्याशी फार मोकळेपणाने बोलत होते. हसत होते. मीही बोलू लागलो. मग तो म्हणाला चला उद्या पुन्हा भेटूया. मी घाबरलो. मला वाटले की कदाचित त्याला मी आवडलो नसेल. कदाचित चित्रपट माझ्या हातातून निसटला असेल. पण तसं झालं नाही मला चित्रपट मिळाला”
‘ते मला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करायला लावायचे’
जेव्हा सुदेश शुटींगसाठी पोहोचले तेव्हा काय घडलं तेही त्यांनी सांगितलं, ते म्हणाले की, “मी येताच अनीस म्हणाला, चित्रपटात तुझा एकच सीन नाही. तर मी ठरवले आहे की संपूर्ण चित्रपटात तुझी भूमिका असेल.” पुढे ते म्हणाले, “त्यांनी मला सीन्स सांगितले. मी म्हणालो सर, माझा कॉमेडी सर्कस मुंबईत सुरू आहे. तुमच्या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेत सुरू आहे. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला विमानाने पाठवू. ते मला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करायला लावायचे.”
‘अरे…मी तुझ्यासारख्यांना ड्रायव्हर ठेवतो’
त्यानंतर सुदेश यांनी सांगितले की “रेडीमध्ये एक दृश्य आहे ज्यामध्ये मी सलमान सरांना म्हणतो, ‘अरे…मी तुझ्यासारख्यांना ड्रायव्हर ठेवतो’. हे बोलायला मला भीती वाटत होती. मी विचार करत होतो की हे कसे बोलायचं? जर तो नाराज झाले तर काय होईल! मी अनीस बझमी सरांना सांगितले की सर, तुम्ही सलमान खानला एकदा सांगा की मला त्यांना हा डायलॉग बोलायचा आहे. म्हणजे मलाही हा आत्मविश्वास मिळेल. जर त्यांना हा डायलॉग काढून टाकायचा असेल तर तुम्ही त्यांना लगेच हा संवाद बदलण्यास सांगाल. किमान मला ते ऐकावे लागणार नाही. पण दिग्दर्शक सहमत झालेनाही.”
थेट सलमानलाच जाऊन विचारलं
त्यानंतर सुदेश यांना तो डायलॉग थेट सलमान खानला बोलण्यास भीती वाटत असल्याने त्यांनी सलमानलाच जाऊन हे विचारलं. त्यांनी पुढचा किस्सा सांगितला, ते म्हणाले “मग मी सलमान सरांकडे गेलो. मी म्हणालो, ‘पाजी हा संवाद आहे’. ते म्हणाले, हो, हो, अगदी मोकळेपणाने बोलं. सलमान सरांनी माझा आत्मविश्वास इतका वाढवला की टेक सहज झाला. जर त्यांनी हे केले नसते तर मी इतके चांगले काम करू शकलो नसतो.”
हा किस्सा सांगत सुदेश यांनी सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. दरम्यान सुदेश यांना ही भूमिका ऑडिशनद्वारेच मिळाली होती. पण त्यांना मिळालेल्या त्या संधीचं त्यांनी नक्कीच सोनं केलं. त्यांच्या भूमिकेचं तेवढं कौतुकही झालं.