नॉनव्हेज हे माणसांसाठी…. म्हणून प्राजक्ता माळी नॉनवेज खात नाही, म्हणाली “माझ्यावर चिडू नका पण…”

प्राजक्ता माळी यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आहारातील पद्धती, आरोग्य दिनचर्या आणि सौंदर्य टिप्सबद्दल सांगितलं आहे. त्या शाकाहारी आहेत आणि नॉनव्हेज खाण्याबद्दल त्यांचे मत स्पष्ट केले. त्यांनी संतुलित आहार, व्यायाम आणि योगाचे महत्त्व सांगितले. तसेच प्राजक्ताने नॉनवेज का सोडलं हे देखील सांगितलं आहे.

नॉनव्हेज हे माणसांसाठी.... म्हणून प्राजक्ता माळी नॉनवेज खात नाही, म्हणाली माझ्यावर चिडू नका पण...
prajkta mali nonveg
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 12:56 PM

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री बनली आहे. हास्यजत्रेच्या तिच्या डायलॉगमुळे असूदेत किंवा मग तिच्या फुलवंती या चित्रपटामुळे किंवा मग तिच्या अध्यात्माच्या विषयांमुळे असूदेत. एवढंच नाही तर प्राजक्ता तिच्या मुलाखतींमुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. प्राजक्ताच्या मुलाखती तिने सांगितलेल्या तिच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगामुळेही व्हायरल झाल्या आहेत.

नॉनवेज खाण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं.

प्राजक्ता माळीच्या मुलाखतीमध्ये तिने केलेली वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्य देखील बरीच चर्चेचा विषय ठरतात. असच एका विषयावर प्राजक्ताने तिचं मत व्यक्त केलं होतं आणि ते बरंच व्हारयल झालं. ते म्हणजे नॉनवेज खाण्याबद्दल. होय, प्राजक्ता माळीने नॉनवेज खाण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं. तसेच तिने नॉनवेज खाणं का बंद केलं ते देखील सांगितलं होतं.

“मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते”

जव्हा प्राजक्ताला तिच्या आवडी-निवडीविषयी विचारण्यात आलं होतं तेव्हा ती म्हणाली होती की, “मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एक म्हणजे उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्या. या दोन्ही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. तुम्ही जे अन्न खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्ही मैदा जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्ही मैद्यासारखेच होणार. त्यामुळे शिळ पॅकेज फूड वगैरे खाऊ नका. जेवढं ताज अन्न खाता याल तेवढं तुम्ही खा. त्यामुळे तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल. शक्य तेवढं लवकर झोपून पहाटे लवकर उठणं गरजेचे आहे. रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसाल असं वाटत असेल तर ते शक्य नाही. या सगळ्यात व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.” अशा पद्धतीने तिने हेल्थी टीप्स दिल्या.

कमीत कमी मेकअप कसा करता येईल याकडे माझा कल असतो

प्राजक्ता पुढे म्हणाली…”आठवड्यातून तीन वेळा तरी व्यायाम केला पाहिजे. मी स्वतः योग करते. मोकळ्या हवेत योग करणे खूप फायदेशीर असतं. एसी लावून योग करू नका. या गोष्टी केल्या तर सौंदर्यप्रसाधने अगदीच दुय्यम वाटू लागतात. तुमच्या पोटात जे जातात तेच सर्वांगावर रिफ्लेक्ट होत असतं. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी चेहरा स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यावर आंघोळ करणं खूप महत्त्वाचं आहे. झोपायच्या आधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. चेहरा क्लीन करून त्यावर टोनर, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर वगैरे लावा. शूटिंग नसेल तर मी अजिबात मेकअप करत नाही नेहमी कमीत कमी मेकअप कसा करता येईल याकडे माझा कल असतो.” प्राजक्ताने ब्युटी टीप्सही दिल्या.


मांसाहार करणाऱ्या लोकांचा मी विरोध करत नाही पण….

डाएट बद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, “मी शाकाहारी आहे. मांसाहार करणाऱ्या लोकांचा मी विरोध करत नाही त्यामुळे माझ्यावर चिडू नका पण एक उदाहरण सांगेन की, आपल्या शरीरात नॉनव्हेज पचण्यासाठी 72 तास लागतात. प्राण्यांची पचन संस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही. हे फक्त मी सांगत नाहीये पण यावर अनेक डॉक्युमेंटरी सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. मी देखील आधी नॉनव्हेज खायचे मग त्यानंतर सोडलं.”

मी फरसाण खाते हे सगळीकडे व्हायरल झाले पण….

तसेच ती म्हणाली, “कोणतेही पदार्थ खाल्ल्यावर त्यामध्ये दोन तासांचा गॅप पाहिजे. जर समजा तुम्ही 2 वाजता जेवलात तर पुढे चार वाजेपर्यंत काहीच खायचं नाही. मधल्या वेळेत पाणी प्या पण काही खाऊ नका. मी फरसाण खाते हे सगळीकडे व्हायरल झाले पण या गोष्टी कधी कधी खायच्या. याची रोजची सवय लावायची नाही. एखाद्या लग्नात गेल्यावर मी खूप जेवले तर दुसऱ्या दिवशी लंघन करते. लंघन म्हणजे उपवास….आदल्या दिवशी खूप खाल्लं असेल तर दुसऱ्या दिवशी मी फक्त फळ खाऊन उपवास करते” असं म्हणत तिने तिच्या अनेक गोष्टी सांगितल्या.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास….

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती फुलवंतीनंतर चिकी चिकी बूबूम बूम या सिनेमात शेवटची दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये बरेच कलाकार मंडळी होते. शिवाय स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहेरे हे उत्कृष्ट कलाकार देखील होते.