मलायका अरोराच्या लव्ह लाईफवर मोठा खुलासा, का करते कमी वयाच्या पुरुषांना डेट? आताचा बॉयफ्रेंड 19 वर्ष लहान!

अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेका अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेकांसोबत मलायकाच्या नावाची चर्चा रंगली. पण अभिनेत्री तिच्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांनाच का डेट करते? यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

मलायका अरोराच्या लव्ह लाईफवर मोठा खुलासा, का करते कमी वयाच्या पुरुषांना डेट? आताचा बॉयफ्रेंड 19 वर्ष लहान!
Malaika Arora
| Updated on: Aug 07, 2026 | 1:53 PM

अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या 52 व्या वर्षी देखील चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते. पण मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिचे नाव अनेक पुरुषांसोबत जोडण्यात आलं. दरम्यान,अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत देखील अभिनेत्री अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मलायका हिच्या नावाची चर्चा हिरे व्यापारी हर्ष मेहता याच्यासोबत रंगू लागली. हर्ष आणि मलायका यांच्यामध्ये तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. अशात मलायका तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांनाच का डेट करते? असा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एक वरिष्ट जर्नलिस्टने मलायका हिच्या डेटिंग लाईफवर मोठं वक्तव्य केलं आहे. जर्नलिस्ट म्हणाल्या, ‘असं काहीही नाही की, पुरुष त्यांच्यापेाक्षा कमी वयाच्या तरुणींना डेट करत नाहीत. 40 वर्षांचे पुरुष 20 वर्षांच्या तरुणींना डेट करतात, त्यांच्यासोबत लग्न करतात.. अशा लोकांसाठी समाजात काही नाव नाही… असे पुरुष सुरक्षित नसतात, त्यामुळे ते त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या मुलींना डेट करतात आणि लहान मुलींना डेट करण्याची त्यांची इच्छा असते…’

पुढे जर्नलिस्ट म्हणतात, ‘मलायका आता समजदार झाली आहे. त्यामुळे ती स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना डेट करत नाही. ती स्वतःची काळजी आता स्वतः घेऊ शकते. मोठ्या वयाचा पुरुष असता, त्याचे प्रश्न देखील अनेक असते. मला असं वाटतं की, तिला तिच्या वयाच्या पुरुष भेटत नसेल, त्यामुळे ती कमी वयाच्या पुरुषांना डेट करत असेल…

‘मलायका एक आत्मनिर्भर मगिला आहे. तिच्यामुळे कदाचित पुरुषांना दडपण येत असावं. कारण शेवटी पुरुषांचा अहंकार असतोच. मात्र, जे पुरुष स्वतःच्या आयुष्यात समाधानी आणि आत्मविश्वासी असतात, ते मलायकासारख्या स्त्रियांची म्हणजेच स्वतःपेक्षा अधिक यशस्वी असलेल्या स्त्रियांची कदर करतात. मला वाटतं, मलायकाच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय.’, असं देखील जर्नलिस्ट मलायका हिच्या लव्ह लाईफबद्दल बोलल्या.

मलायका आणि हर्ष मेहता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण यावर दोघांनी देखील कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us