Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan ची 5 हजार कोटींची संपत्ती, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही, कारण….

Saif Ali Khan : बॉलिवूडचा स्टार सैफ अली खानची सध्या चर्चा आहे. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याच्या निमित्ताने सैफबद्दल वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे. सैफ अली खानकडे वारसाहक्काने आलेली संपत्ती 5 हजार कोटींच्या घरात आहे. पण ही संपत्ती तो कोणाच्याच नावावर करु शकत नाही. त्याच्या चार मुलांच्या नावावर ही संपत्ती होऊ शकत नाही.

Saif Ali Khan ची 5 हजार कोटींची संपत्ती, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही, कारण....
Saif Ali Khan and Kareena KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 8:29 AM

बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. काल त्याच्यावर घरातच जीवघेणा हल्ला झाला. सुदैवाने सैफ या हल्ल्यातून बचावला. सैफवर सध्या वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरात घुसलेल्या चोराने सैफवर हा हल्ला केला. सैफ अली खानवर काल दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पाच ते सहा तास या शस्त्रक्रिया सुरु होत्या. त्यावरुन हा हल्ला किती गंभीर होता हे लक्षात येतं. चोराने सैफ अली खानला भोसकलं. त्याच्या शरीरावर सहा जखमा झाल्या. त्यात पाठिच्या कण्याला झालेली जखम गंभीर होती. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. सैफच्या पाठितून एक टोकदार चाकूचा तुकडा बाहेर काढला. सैफच्या प्रकृतीला आता कुठलाही धोका नाहीय. पुढच्या दोन-तीन दिवसात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.

या हल्ल्यानंतर सैफ अली खानच कुटुंब, त्याची मुलं, आगामी सिनेमे त्याची संपत्ती, बिझनेस याची चर्चा सुरु झाली आहे. सैफ अली खान हा नवाबांच्या कुटुंबातून येतो. पतौडी कुटुंबातील सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे. रिपोर्टनुसार, हरियाणा येथील पतौडी पॅलेस आणि भोपाळ येथील संपत्ती मिळून त्याच्याकडे तब्बल 5 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याशिवाय सैफचा ‘हाऊस ऑफ पटौदी’ नावाचा ब्रांड आहे. 2018 साली त्याने हा व्यवसाय सुरु केला. देशातील वेगवेगळ्या शहरात त्याने दुकानं उघडण्यास सुरुवात केली. सैफच्या स्वत:च्या नावावर आज 1300 कोटीची संपत्ती आहे.

सैफची दोन लग्न

सैफ अली खानने दोन लग्न केली. पहिली पत्नी अमृता सिंह सोबत घटस्फोट झालाय. तिच्यापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. करीनासोबत दुसरं लग्न केलं. त्या लग्नापासून तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.

का संपत्तीची वाटणी करता येणार नाही?

वारसा हक्काने सैफ अली खानकडे आलेली संपत्ती 5 हजार कोटींच्या घरात आहे. पण तो या संपत्तीची त्याच्या चार मुलांमध्ये वाटणी करु शकत नाही. कारण त्याची ही संपत्ती Enemy Dispute Act 1968 अंतर्गत येते. या कायद्यातंर्गत कोणीही त्या प्रॉपर्टीवर अधिकार सांगू शकत नाही. जे लोक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी किंवा 1965 आणि 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानात निघून गेले. तिथले नागरिक बनले. त्यांची सर्व अचल संपत्ती ‘एनिमी डिस्प्यूट प्रॉपर्टी’ म्हणून घोषित केली.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.