Alia Bhatt: मुलीचं नाव ‘हे’ ठेवून आलिया भट्ट पूर्ण करणार का शोमध्ये दिलेलं वचन?

'सुपर डान्सर 3'मध्ये आलियाने दिलं होतं वचन; "भविष्यात मुलगी झाल्यास ठेवणार 'हे' नाव"

Alia Bhatt: मुलीचं नाव हे ठेवून आलिया भट्ट पूर्ण करणार का शोमध्ये दिलेलं वचन?
Alia Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 06, 2022 | 4:51 PM

मुंबई- रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये या दोघांनी पहिल्यांदा जेव्हा एकत्र सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली, तेव्हा त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. जवळपास सहा-सात वर्षे डेट केल्यानंतर रणबीर-आलियाने या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. आलियाने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली. रविवारी सकाळी तिने मुलीला जन्म दिला. कपूर आणि भट्ट कुटुंबात सध्या आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे.

आलियाच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच रणबीर आणि आलिया त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवणार, याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.

2019 मध्ये आलिया आणि रणवीर सिंग हे त्यांचा ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘सुपर डान्सर 3’ या शोच्या सेटवर पोहोचले होते. या शोमधील स्पर्धक सक्षम शर्मा त्याच्या डान्ससोबतच मजेशीर इंग्लिश स्पेलिंगसाठी प्रसिद्ध होता. 8 वर्षीय सक्षम ज्याप्रकारे चुकीचे स्पेलिंग सांगायचा, ते ऐकून सर्वांनाच हसू अनावर व्हायचं.

या शोमध्ये सक्षमने रणवीर सिंगच्या नावाची स्पेलिंग ‘Ranvae sing’ अशी सांगितली होती. त्यावर रणवीर म्हणाला होती, “होय, फ्रेंचमध्ये माझ्या नावाचा उल्लेख असाच होतो.” जेव्हा आलियाच्या नावाची स्पेलिंग विचारली गेली, तेव्हा सक्षमने ‘Almaa’ असं सांगितलं होतं. हे ऐकून आलिया मस्करीत म्हणाली, “भविष्यात जर मला मुलगी झाली, तर मी तिचं नाव ‘अलमा’ असंच ठेवीन.” आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर आता चाहते सक्षम आणि सुपर डान्सर 3 मधल्या या मजेशीर एपिसोडची आठवण काढत आहेत.