जिच्यासाठी विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात केला राडा; तीच घेणार घटस्फोट?

ख्रिसने विलची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या (Jada Pinkett Smith) आजारपणाची खिल्ली उडवल्याने त्याचा राग अनावर झाला आणि ऑस्करच्या मंचावर जाऊन त्याने कानाखाली मारली. जिच्यासाठी विलने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा केला, तीच आता त्याच्याशी घटस्फोट (Divorce) घेणार असल्याचं वृत्त समोर येतंय.

जिच्यासाठी विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात केला राडा; तीच घेणार घटस्फोट?
Will Smith, Jada Pinkett Smith
Image Credit source: AP
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 12:20 PM

94व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता विल स्मिथने (Will Smith) सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याची घटना चांगलीच गाजली. ख्रिसने विलची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या (Jada Pinkett Smith) आजारपणाची खिल्ली उडवल्याने त्याचा राग अनावर झाला आणि ऑस्करच्या मंचावर जाऊन त्याने कानाखाली मारली. जिच्यासाठी विलने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा केला, तीच आता त्याच्याशी घटस्फोट (Divorce) घेणार असल्याचं वृत्त समोर येतंय. विल आणि जाडा यांच्या वैवाहिक आयुष्यात आधीपासूनच कलह होते, मात्र ऑस्करच्या घटनेनंतर हा वाद आणखी वाढला. त्या घटनेनंतर जाडा आणि विल यांच्यात फारसा संवाद होत नसल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर जाडाने विलला घटस्फोट देण्याचं ठरवल्याचं समजतंय.

‘ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील वादानंतर विल स्मिथ आणि जाडा यांच्यातील दुरावा आणखीनच वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या, पण आता ते फारच क्वचित एकमेकांशी बोलत आहेत’, असं वृत्त ‘हिट मॅगझिन’ने दिलंय. हॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या या दोघांच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चांना ऊत आला आहे. जर विल स्मिथ आणि जाडाचा घटस्फोट झाला तर हा हॉलिवूडमधील सर्वांत महागडा घटस्फोट ठरू शकतो. जाडाला विलच्या संपत्तीपैकी अर्धा वाटा मिळू शकतो. विलची एकूण संपत्ती ही 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 2 हजार कोटी रुपयांची आहे. ब्रॅट पिट आणि अँजेलिना जोली यांच्या घटस्फोटापेक्षाही हा महागडा ठरू शकतो.

इन्स्टा पोस्ट-

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील घटनेनंतर विल स्मिथवर अकॅडमीने पुढील दहा वर्षांसाठी बंदी आणली आहे. विल आणि जाडाने 1997 मध्ये लग्न केलं. या दोघांनी तीन मुलं आहेत. अनेकदा मुलाखतींमध्ये या दोघांनी त्यांच्या नात्यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. आपल्या नात्यातील चढउतारांबद्दल ते नेहमीच माध्यमांसमोर व्यक्त झाले होते.

हेही वाचा:

शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीची लगीनघाई; खास मैत्रिणीने केलं दोघांचं केळवण

Aai Kuthe Kay Karte: ‘..तर फार अस्वस्थ होतं’; ‘अरुंधती’ची ही खास पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत