AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: सैन्यदलातील पतीविषयी बोलताना थिएटरमध्ये पत्नी भावूक; सई मांजरेकरने शेअर केलेला Video एकदा पहाच!

चित्रपट पाहिल्यानंतर भावूक झालेल्या महिलेच्या आणि सैन्यदलात काम करणाऱ्या तिच्या पतीच्या व्हिडिओला सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांकडून दाद तर मिळालीच. पण हा व्हिडीओ आदिवी शेष आणि सई मांजरेकर यांच्या हृदयालाही स्पर्शून गेला.

Video: सैन्यदलातील पतीविषयी बोलताना थिएटरमध्ये पत्नी भावूक; सई मांजरेकरने शेअर केलेला Video एकदा पहाच!
Saiee ManjrekarImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 3:36 PM
Share

तेलुगू अभिनेता आदिवी शेष (Adivi Sesh) याची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेजर’ (Major) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. याच चित्रपटाच्या शोदरम्यानचा थिएटरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ अभिनेत्री सई मांजरेकरही (Saiee Manjrekar) तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये मेजरच्या स्क्रिनिंगदरम्यान एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी तिच्या पतीबद्दल बोलताना रडताना दिसतेय. चित्रपट पाहिल्यानंतर भावूक झालेल्या महिलेच्या आणि सैन्यदलात काम करणाऱ्या तिच्या पतीच्या व्हिडिओला सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांकडून दाद तर मिळालीच. पण हा व्हिडीओ आदिवी शेष आणि सई मांजरेकर यांच्या हृदयालाही स्पर्शून गेला. 26/11 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान अनेक नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

‘दिल्लीची पूजा यादव तिच्या पतीबद्दल यात बोलताना दिसतेय. सैन्यदलात काम करणाऱ्या पतीविषयी पत्नी यात बोलतेय. सैनिकांच्या कुटुंबीयांचं बलिदान ओळखण्यासाठी मेजर हा चित्रपट लोकांची मदत करतोय हे पाहून कृतज्ञतेची भावना मनात येते. या सर्व कुटुंबांना फक्त शक्ती आणि प्रेम मिळो’, अशा शब्दांत सईने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पहा व्हिडीओ-

गुरुवारी आदिवी शेषने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हाच व्हिडीओ शेअर केला होता. “हे माझे पती मेजर अभिषेक आहेत आणि तेसुद्धा तसंच काम करत आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो”, असं पूजा या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. त्यानंतर तिचा पती उठतो आणि तिला मिठी मारतो. हे पाहून थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनीही त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात. ‘ही क्लिप मला काल रात्री व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली होती. मेजर तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे आणि लोकांना प्रेरणा देत आहे. ही हृदयस्पर्शी प्रतिक्रिया पाहून मला खूप आनंद झाला,’ अशी पोस्ट आदिवीने लिहिली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.