
15 Bollywood Celebs Died In 2025 : आता संपत आलेलं हे 2025चं वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरलं नाही, उलट अनेक दु:खद प्रसंग आले. बॉलिवूड, टीव्ही, मराठी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी (Bollywood Celebrities) , दिग्गज यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचं जाणं हे फक्त कुटुंबियांसाठीच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन सृष्टी, चाहते यांच्यासाठीही खूप धक्कादायक होतं. या स्टार्सनी त्यांच्या कला आणि अभिनयाने लोकांच्या हृदयावर अशी अमिट छाप सोडली की त्यांची नेहमीच उणीव भासेल.
या वर्षी असे अनेक कलाकार गेले, ज्यांनी मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यापर्यंत, आपल्या उत्तम अभिनयाने प्रत्येक घरात आपले स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या अचानक एक्झिने इंटस्ट्रीत शोककलआ पसरली. यावर्षी निधन झालेले काही सेलिब्रिटी..
धर्मेंद्र
बॉलिवूडचे “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे काही दिवसांपूर्वीच, म्हणजे 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. ते काही काळापासून गंभीर आजारी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली.
मनोज कुमार
“भारत कुमार” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने अभिनेते मनोज कुमार यांचे 4 एप्रिल 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या देशभक्तीपर भूमिका नेहमीच लक्षात राहतील.
सतीश शाह
अचूक कॉमिक टायमिंग,खणखणीत अभिनय आणि सुरेल आवाज, प्रभावी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते सतीश शाह यांचे 25 ऑक्टोबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. “साराभाई व्हर्सेस साराभाई” सारख्या मालिकांसाठी आणि “मैं हूं ना” सारख्या चित्रपटांसाठी ते नेहमीच लक्षात राहतील.
गोवर्धन असरानी
“शोले” चित्रपटात ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ या भूमिकेत अवघ्या काही सेकंदासाठी ते दिसले, पण त्यांची ती भूमिका नेहमीच लक्षा राहिली. गोवर्धन असरानी हे त्यांचं नाव अनेकांना माहीत नव्हतंच. फक्त असरानी नावाने ओळखला जाणारा हाँ अभिनेता बॉलिवूडमध्ये कित्येक वर्ष कार्यरत होता. 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
पंकज धीर
‘महाभारत’ मालिकेमध्ये कर्णाची संस्मरणीय भूमिका साकारल्यानंतर घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते पंकज धीर यांनी कर्करोगाशी दीर्घ लढाई दिल्यानंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला.
मुकुल देव
बॉलिवूड चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा असलेले अभिनेते मुकुल देव याने 23 में 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपटात गाजलेला हाँ देखणा अभिनेता बऱ्याच काळापासून आजारी होता.
शेफाली जरीवाला
‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यातून घराघरांत पोहोचलेली, टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी निधन झालं. 27 जून 2025 रोजी तिला कार्डिॲक अरेस्ट आला आणि तिने अखेरचा श्वास घेतला.
सुलक्षणा पंडित
70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे 6 नोव्हेंबर 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. संजीव कुमार यांच्यावर खूप प्रेम करणाऱ्या या अभिनेत्रीने कधीही लग्न केले नाही.
कामिनी कौशल
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्या बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर होत्या.
दया डोंगरे
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांचे 3 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. चित्रपटांमधील त्यांच्या उत्तम कामगिरीनंतर, दया डोंगरे यांनी लग्नानंतर रंगभूमीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या मनात सदैव स्मरणात राहतील.
जुबीन गर्ग
आसाम, बंगाली आणि बॉलिवूड मधील संगीत क्षेत्रात आपल्या समधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा गायक झुबीन गर्ग याचं 19 सप्टेंबर 2025 रोजी अकस्मात निधन झालं. त्यांच्या निधनाने चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.
हरीश राय
‘KGF’ चित्रपटात कासिम चाचाची भूमिका साकारणारे अभिनेते हरीश राय यांचे 6 नोव्हेंबर 2025 रोजी कर्करोगामुळे निधन झाले.
अच्युत पोद्दार
“थ्री इडियट्स” आणि “लगे रहो मुन्नाभाई” सारख्या चित्रपटांतील भूमिकांमुळे गाजलेले, गेली अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीत कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे 18 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ‘अरे भाई कहना क्या चाहते हो’ ही त्यांची एक ओळ सोशल मीडियावर मीम म्हणून खूप प्रसिद्ध झाली.
धीरज कुमार
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचेही 2025 मध्ये निधन झाले, हे टेलिव्हिजन उद्योगाचे मोठे नुकसान असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांनी टेलिव्हिजनसाठी अनेक पौराणिक कार्यक्रमांची निर्मिती केली होती.
पीयूष पांडे
भारतीय जाहिरात जगतातील एक अनुभवी आणि अनेक प्रतिष्ठित जाहिरातींचे सूत्रधार पियुष पांडे यांचेही या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली.