
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री झरिन खान हिच्या आठवणीत मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीचीच चर्चा रंगली आहे. कोलकाता न्यायालयाने झरिन खानविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीवर करण्यात आलेल्या आरोपांची चर्चा रंगली आहे. झरिन खान हिच्यावर २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर देखील झरिन हिने जामिनासाठी अर्ज दाखल केला नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्री न्यायालयात देखील हजर राहत नव्हाती म्हणून न्यायालयाने अभिनेत्री विरोधआत अटक वॉरंट जारी केलं. या प्रकरणामुळे अभिनेत्रीला देखील मोठा धक्का बसला आहे…
2018 मध्ये 6 कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल अभिनेत्री झरिन खान हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल अभिनेत्री विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. सध्या सर्वत्र झरिन खान हिचीच चर्चा रंगली आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नरकेलडांगा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केलं. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी झरिन खान हिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना कोणताही प्रतिसात मिळात नसल्याची माहिती मिळत आहेय. यावर आता अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
झरिन खान म्हणाली, ‘मला विश्वास आहे की यामध्ये काहीही तथ्य नाही. जेव्हा मला हे प्रकरण कळालं, तेव्हा मी स्वतः हैराण झाले…. मी मझ्या वकिलांच्या संपर्कात आहे. सर्वकाही स्पष्ट झाल्यानंतर मी यावर काही बोलू शकेल. तुम्ही माझ्या पीआरला याबद्दल विचारू शकता.’ असं अभिनेत्री म्हणाली. अशात सत्य नक्की काय आहे… हे अभिनेत्रीच्या स्पष्ट वक्तव्यानंतर समोर येईल.
झरिन खान हिने तिच्या अभिनयाची सुरुवात २०१० मध्ये सलमान खान याच्यासोबत ‘वीर’ सिनेमातून केली. सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. एवढंच नाही तर, झरिन हिच्या अभिनयाचं देखील सर्वच स्थरातून कौतुक झालं. त्यानंतर झरिन खान हिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत होवू लागली. आता झरिन बॉलिवूडपासून दूर आहे.
‘वीर’ सिनेमानंतर झरिन खान हिने ‘हेट स्टोरा ३’, ‘अक्सर’, ‘वजह तुम हो’, ‘हाऊसफूल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.