FEATURED

Jio IPO: जिओ आयपीओने रचला इतिहास, वारी एनर्जीचा रेकॉर्ड मोडला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Jio Platforms IPO: अपेक्षेप्रमाणे अखेर जिओ आयपीओने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केलेच. हा आयपीओ खरेदी करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार, कर्मचारी, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. वारी एनर्जीचा रेकॉर्डही मोडीत निघाला.

Jio IPO: जिओ आयपीओने रचला इतिहास, वारी एनर्जीचा रेकॉर्ड मोडला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
Jio IPO ने रचला इतिहास, वारी एनर्जीचा रेकॉर्ड मोडला
| Updated on: Oct 24, 2026 | 11:19 AM

Jio Platforms IPO: जिओ प्लॅटफॉर्मचा आयपीओ सर्वांच्या पसंतीस उतरला. आयपीओचा मोठा आकार तर कधी खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, जिओ आयपीओने भारतीय शेअर बाजारात इतिहासाचा झेंडा रोवला. मोठ्या संस्थागत गुंतवणूकदार, परदेशी गुंतवणूकदार, रिलायन्सचे कर्मचारी, किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओला भरभरून प्रतिसाद दिला. गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 30,213 कोटींच्या या आयपीओने तीन दिवसात भारतीय शेअरबाजारात सुवर्णपान जोडले. या आयपीओला 7.40 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या बोली लागल्या. 1.38 कोटींहून खरेदीदारांनी नोंदणी केली. जागतिक पातळीवरही याची मोठी चर्चा सुरू आहे.

जिओ आयपीओने इतिहास रचला

Loading...

सर्वात मोठा इश्यू आणि तुफान प्रतिसाद

30,213 कोटी रुपयांचा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला. हा आयपीओ खरेदीसाठी अँकर गुंतवणूकदार आणि सार्वजनिक प्रक्रियेतून 7.4 लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व मागणी नोंदवली गेली. सर्वात मोठा प्रतिसाद मिळाला.

तीन दिवसात गुंतवणूकदारांच्या उड्या

अवघ्या तीन दिवसात हा आयपीओ खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. आयपीओ उघडताच पहिल्या तीन तासातच इतिहास रचला गेला. संपूर्ण इश्यू सब्सक्राईब झाला. तर अवघ्या 10 मिनिटात 5,500 कोटी रुपयांच्या QIB चा कोटा पूर्णपणे भरला.

खरेदीदारांच्या नोंदीचा जागतिक विक्रम

खरेदीदारांच्या नोंदीचा जागतिक विक्रम जिओने केला. जगात प्रथमच एखादग्या आयपीओमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक नोंदी झाल्यात हा आकडा थेट 1.38 कोटींवर पोहोचला. त्याने यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. इतरांपेक्षा जिओने 42 टक्के अधिक अर्ज मिळवले.

गुंतवणूकदार श्रेणीतही तुफान

QIB श्रेणीत 3.87 लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या. हा वाटा 70.55 पट अधिक आहे. गैर-संस्थागत गुंतवणूकदार श्रेणी 14 पट, तर सामान्य गुंतवणूकदारांचा वाटा 2.72 पट सब्सक्राईब झाला. तर रिलायन्सच्या भागधारकांचा हिस्सा 7.60 पट, कर्मचाऱ्यांचा वाटा 2.93 पट होता.

परदेशी गंगाजळी आणली खेचून

या वर्षी भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री सत्र आरंभले होते. त्यांनी 33 अब्ज डॉलर्सची विक्री केली होती. निफ्टीमधील घसरणीमागे याचा मोठा हात होता. तर आता जिओ आयपीओने 92 अब्ज डॉलर्सची परदेशी गंगाजळी खेचून आणली. यामुळे अप्रत्यक्ष, प्रत्यक्षरित्या भारतीय रुपयाला बळकटी मिळाली. वाढत्या कच्चा तेलाच्या किंमतीत हा मोठा आधार ठरला.

रिलायन्स समूहाला जिओ आयपीओमुळे मोठी लॉटरी

या आयपीओच्या ऑफर प्राईसमुळे 10.3 लाख कोटी भांडवल, मार्केट कॅप जमा होईल. जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील तीन सूचीबद्ध कंपन्यांमध्ये अव्वल स्थान पटकवण्याच्या मार्गावर आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर रिलायन्स समूह हा भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह ठरणार आहे.

Jio IPO कधी होणार सूचीबद्ध?

जिओचा IPO 21 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला. तर शेअर्सचे अलॉटमेंट 26 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबर रोजी शेअर NSE आणि BSE वर सूचीबद्ध होतील. येत्या चार दिवसानंतर हा शेअर किती उसळी घेऊन सूचीबद्ध होतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

जिओ आयपीओ खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us