FEATURED

Anant Ambani: “माझ्या आजी-आजोबांमुळेच मी आज इथं”, गिरिराज धरण परिक्रमेसाठी अनंत अंबानी वृंदावनात दाखल

Reliance Industries Anant Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी शुक्रवारी पवित्र गोवर्धन परिक्रमेसाठी वृंदावनात दाखल झाले. त्यावेळी त्यांचे भव्य स्वागत झाले. त्यांनी यावेळी त्यांच्या आजी-आजोबांच्या आठवणी जागवल्या.

Anant Ambani: माझ्या आजी-आजोबांमुळेच मी आज इथं, गिरिराज धरण परिक्रमेसाठी अनंत अंबानी वृंदावनात दाखल
गिरिराज धरण परिक्रमा, अनंत अंबानी वृंदावनात दाखल
| Updated on: Nov 28, 2026 | 10:26 AM

Reliance Industries Anant Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी शुक्रवारी पवित्र गोवर्धन परिक्रमेसाठी वृंदावनात दाखल झाले. यावेळी त्यांनी त्यांच्या आजी-आजोबांची आठवणी जागवल्या. परिक्रमा मार्गावर विविध ठिकाणी भाविक आणि स्थानिकांनी त्यांचे उत्साहात भव्य स्वागत केले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्याने ते भारावून गेले. गिरिराज धरण यांच्या पूर्ण परिक्रमेनिमित्त अंबानी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासाची सध्या सगळीकडे मोठी चर्चा आहे.

मंदिरात दर्शन आणि कृष्णलीलेच्या सादरीकरणाने भारावले

Loading...

गोवर्धन पर्वताच्या गिरीराज परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी अनंत अंबानी श्री गिरिराज जी मुखारविंद्र मंदिरात गेले. तिथे त्यांनी भगवंताचे दर्शन घेतले आणि पूजा केली. धार्मिक विधीसाठी ते परिक्रमेसाठी निघाले असताना उपस्थितांनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. परिक्रमा मार्गावर ब्रिजच्या समृद्ध सांस्कृतिक आणि भक्ती परंपरेचे यावेळी दर्शन घडले. स्थानिक कलाकारांनी भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे, कृष्णलीलेचे सादरीकरण केले. ते पाहताना अनंत अंबानी मंत्रगुद्ध झालेले दिसले. त्यांचे अंत:करण उचंबळून आलेले दिसले. ते कृष्ण लीलेने भारवलेले, हरखून गेलेले दिसले.

आजी-आजोबांच्या आठवणीत रमले

या आध्यात्मिक आणि ऊर्जावान वातावरणात अनंत अंबानी यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी यावेळी आजी-आजोबांच्या आठवणी जागवला. गिरिराज धरण यांची पूर्ण परिक्रमा करत असताना इथं अत्यंत आनंददायी वाटत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी ब्रजवासियांच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आज मी इथ आलोय, ते माझ्या आजी-आजोबांमुळेच. त्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शनाने मला इथं आणलं आहे. मी पूर्ण परिक्रमेसाठी येत असल्याचे समजताच त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या वतीने मी आदरभाव अर्पण करतो.” असे अनंत अंबानी म्हणाले. त्यांनी यावेळी भारताचे उत्तम कल्याण व्हावे, अशी ईश्वराकडे प्रार्थना केली.

गिरिराज धरण परिक्रमा, अनंत अंबानी वृंदावनात दाखल

पुजाऱ्याकडून सदिच्छा

यावेळी श्री गिरिराज जी मुखारविंद मंदिराचे पुजारी गणेश यांनी अनंत अंबानी यांच्याशी भेटीवर आनंद व्यक्त केला. अनंत अंबानी यांच्या गिरिराज भेटीमुळे मोठा आनंद झाला. त्यांचे आई-वडील तसेच आजी-आजोबा यांचे गिरिराजजींशी घट्ट नाते आहे. या सर्वांनी मंदिरामध्ये सातत्याने सेवा आणि दानधर्म केला आहे. त्यांच्या कुटुंबाला उत्तरोत्तर कीर्ती आणि समृद्धी लाभो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या परिक्रमा मार्गावर अनंत अंबानी यांना स्थानिक लोकांचे आणि भाविकांचे भरभरून प्रेम दिसून आले.

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us